Other

केळी पीक विमा अपील पात्र प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

महा पोलीस न्यूज | १४ फेब्रुवारी २०२४ | जळगाव जिल्ह्यातील केळीच्या पीक विम्या बाबत ज्यांचे प्रकरण नामंजूर झालेले आहेत. त्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने गंभीर दाखल घेतली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाला १०६१९ नामंजूर प्रकरण होती. त्याची फेरतपासणी करून अपील पात्र झालेल्या प्रस्तावावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

केळी पीक विम्या बाबत २ फेब्रुवारी रोजी विविध संघटनाकडून मोर्चा काढला होता. त्याअनुषंगाने ठरल्याप्रमाणे १४ फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाची बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

या बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील, मुमराबाद कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ हेमंत बाहेती, बाळासाहेब बाळके, अभिनव माळी, भरत वारे व डी.बी. लोंढे, रावेर, मुक्ताईनगर, यावल व चोपडा या तालुक्याचे कृषी अधिकारी तसेच जिल्हा विमा कंपनी प्रतिनिधी व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यातील एकूण केळी पीक विमा प्रस्तावामध्ये जिल्हयातील १०६१९ नामंजूर करण्यात आले आहेत त्या प्रस्तावांमधील बहुतांश केळी पिकाचे क्षेत्र हे चोपडा, यावल, रावेर, जळगाव व मुक्ताईनगर या तालुक्यातील असल्याने तेथील तालुका कृषि अधिकारी यांना देखील या बैठकीला बोलावण्यात आले होते.

त्यानुसार रावेर, यावल, मुक्ताईनगर, जळगाव व चोपडा या तालुक्यात ७९७१ इतक्या शेतक-यांचे पिक विमा प्रस्ताव दाखल करण्यात आलेले असुन त्यापैकी ५२३५ शेतक-यांनी तालुकास्तरीय समिती कडे अपील दाखल करण्यात आलेले होते. त्यापैकी ३८५६ अपील पात्र असुन १३७९ अपील अपात्र करण्यात आलेले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणी लक्ष घालून जिल्हा प्रशासनाला याबाबत पात्र शेतकऱ्यांच्या हक्काची विमा रक्कम मिळावी यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button