Gold-Silver Rate | सोने-चांदीचे दर पुन्हा घसरले, बघा आज काय आहे स्थिती

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । सराफ बाजारात मागील दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. भंगाळे गोल्ड दालनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आज कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ₹१,१२,५७०, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,२२,९०० असा आहे. चांदीचा दर देखील पुन्हा ₹१,५७,००० प्रति किलो नोंदवण्यात आला आहे.
दिवाळीनंतर सुरू झालेल्या लग्नसराईच्या मोसमामुळे सोन्या-चांदीची मागणी वाढत असून दरात गेल्या दोन दिवसांत मोठा चढउतार झालेला आहे. ग्राहकांकडून दागिन्यांची खरेदी स्थिर गतीने सुरू असून प्रीमियम डिझाईन्स, हलके वजनाचे दागिने आणि लग्नातील पारंपरिक सेट्सला मोठी पसंती मिळत आहे.
भंगाळे गोल्ड दालनात जळगाव आणि सावदा येथे विविध आकर्षक दागिन्यांचे नवीन कलेक्शन उपलब्ध असून, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी कायम आहे. व्यावसायिकांच्या माहितीनुसार “दर स्थिर असले तरी लग्नसराईमुळे खरेदीचा ओघ कमी झालेला नाही. ग्राहक सोने-चांदीचे दागिने पाहण्यासाठी आणि बुकिंगसाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत.”
आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या-चांदीच्या दरातही स्थिरता असल्याने स्थानिक बाजारातही मोठा बदल अपेक्षित नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र परदेशी बाजारातील हालचाली, डॉलर निर्देशांकातील चढउतार आणि गुंतवणूकदारांचा कल कोणत्या दिशेने बदलतो त्यावर येणाऱ्या दिवसांतील दर अवलंबून असतील.
आजचे दर — (BHANGALE GOLD : JALGAON & SAVDA)
धातू कॅरेट आजचा दर
सोने 22K ₹१,१२,५७० प्रति तोळा
सोने 24K ₹१,२२,९०० प्रति तोळा
चांदी किलो ₹१,५७,००० प्रति किलो
(Rates may change during the day)
सध्या बाजारात स्थिरता असली तरी आगामी आठवड्यात लग्नाची लगबग वाढेल आणि त्यानुसार मागणीही वाढेल, त्यामुळे दरातील हलके-फुलके बदल सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




