कामगिरी : रावेर पोलिसांनी पकडले बॅटरी चोर
महा पोलीस न्यूज । ८ ऑगस्ट २०२४ । रावेर तालुक्यात ट्रॅक्टरच्या बॅटरी चोरी होत असल्याने शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाले होते. रावेर पोलिसांनी गोपनीय माहिती काढून दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडून तीन बॅटरी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
रावेर पोलीस स्टेशनला सीसीटीएनएस गुरन ३६४/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यात रावेर शहरातील डी.एम.हॉलच्या मागे उर्दू शाळेजवळ राहणारे फिर्यादी इकबाल खान गुलशर खान वय ४० यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या व अज्ञात आरोपीताचा शोध घेण्यासाठी पथक तपासकामी रवाना झाल्यावर गुप्त बातमीदाराने बातमी दिली होती.
पथकाने रावेर शहरातील नागझिरी परिसरातून मुस्तकीम खान मन्नान खान वय २० वर्ष रा.नागझीरी, अमिर खान युनुस खान वय २३ वर्ष रा.रसलपुर ग्रामपंचायत समोर यांना ताब्यात घेवुन रावेर पोलीस स्टेशन येथे आणले. आरोपीतांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी शेख नय्युम शेख कय्युम, नगिनदास मनोहर बिरपन रा.भाटखेडा यांच्या ट्रॅक्टरसह आणखी एक बॅटरी काढून दिली आहे.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या पथकातील गुन्हे शोध पथकातील हवालदार रविंद्र वंजारी, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, विकार शेख, अमोल जाधव, महेश मोगरे यांच्या पथकाने केली आहे.