Crime

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करणारा डंपर पकडला; जेसीबी घेऊन चालक फरार

वाळू माफियांवर महसूल विभागाची कारवाई; १५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करणारा डंपर पकडला; जेसीबी घेऊन चालक फरार

वाळू माफियांवर महसूल विभागाची कारवाई; १५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

भडगाव (प्रतिनिधी): भडगाव शहरातील पेठ भागाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्या टोळीवर महसूल विभागाने छापा टाकत कारवाई केली. या कारवाईदरम्यान एक डंपर जप्त करण्यात आला असून, जेसीबी मशिन घेऊन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. संबंधित डंपर व जेसीबी मालक, तसेच चालकांविरुद्ध भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंडळ अधिकारी विजय येवले यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाचे पथक रविवार, ६ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता स्मशानभूमीजवळील गिरणा नदीपात्रात कारवाईसाठी पोहोचले. यावेळी पिवळ्या रंगाच्या जेसीबी मशिनद्वारे वाळू उत्खनन करून ती पांढऱ्या-निळ्या रंगाच्या MH37 AA 8787 या क्रमांकाच्या डंपरमध्ये भरताना आढळले. महसूल पथक जवळ येत असल्याचे लक्षात येताच जेसीबी चालकाने मशीनसह पलायन केले.

जेसीबी मशिनचा चेसीस नंबर HAR3DXXAL01494624 असून, ते रविंद्र भगवान पवार (रा. भडगाव पेठ) यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. डंपर चालकाने स्वतःचे नाव नामदेव रावन पाटील (रा. भडगाव पेठ) असे सांगितले व आपणच डंपरचा मालक असल्याचेही सांगितले.

जप्त केलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे:एक जेसीबी मशिन (किंमत अंदाजे ₹१०,००,०००) एक डंपर (किंमत अंदाजे ₹५,००,०००) अंदाजे सव्वा ब्रास वाळू (किंमत ₹६,०००) एकूण जप्त मुद्देमालाची किंमत: ₹१५,०६,०००

याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३०२(२), तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे कलम ४८(७) आणि ४८(८) अंतर्गत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय जाधव करत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button