Social

भडगावमध्ये जखमी मादी वानराचा मृत्यू; बजरंग दल कार्यकर्त्यांकडून सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार

भडगावमध्ये जखमी मादी वानराचा मृत्यू; बजरंग दल कार्यकर्त्यांकडून सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार
भडगाव (प्रतिनिधी): भडगाव शहरातील ग्रीन पार्क कॉलनी परिसरात एका मादी वानराचा आज (दि. १६ जून) जखमी अवस्थेमध्ये मृत्यू झाला. सदर मादी वानर आपल्या पिल्लासह काही दिवसांपासून परिसरात फिरताना दिसत होती. तिच्या पायाला गंभीर जखम झाल्याने ती हालचाल करण्यात असमर्थ होती आणि अखेर ती मृत अवस्थेत आढळली.

ही घटना स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सोनू मुनाफ खाटीक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ बजरंग दल कार्यकर्त्यांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोहोचत कार्यकर्त्यांनी मादी वानराचा मृतदेह सन्मानपूर्वक भडगावच्या स्मशानभूमीत नेला आणि तेथे विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. वानराचे पिल्लू सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, त्याची देखभाल करण्यात येत आहे.

घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून पुढील कार्यवाही प्रक्रियेत आहे. या वेळी बजरंग दलाचे गणेश वाघ, मानस पाटील, सोनू पाटील, अनिल अहिरे, संदेश राजपूत, अजय राजपूत, शांताराम पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या संवेदनशील कृतीमुळे स्थानिक नागरिकांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले असून, प्राणीमात्रांप्रती असलेली आपुलकी आणि सामाजिक भान अधोरेखित झाले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button