भडगावच्या सुंदरबनच्या खाजगी मालमत्तेवरील झाडे अधिकृत परवानगी घेऊनच काढले

भडगावच्या सुंदरबनच्या खाजगी मालमत्तेवरील झाडे अधिकृत परवानगी घेऊनच काढले
हाजी कादिर शेठ यांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण
भडगाव प्रतिनिधी –शहरातील टोणगाव शिवारातील गट क्रमांक ५६१/१ सुंदरबन हे चाळीसगाव रस्त्यावरील कृषी पूरक जमीन आहे त्या जमिनीवर आता पुढील प्रयोजनासाठी अकृषिक (बिनशेती)वापरासाठी नगरपरिषद व संबंधित कार्यालयांकडून परवानगी घेतली आहे.यासाठी जमिनीमध्ये ग्रामपंचायत पासून परवानगी घेऊन चारही बाजूस सुळबाभूळ, बाभूळ, यासह निंब, चिंचोळाअसे अंदाजे १४ झाडांची लागवड केली होती ती आता अकृषिक (बिनशेती)म्हणजेच प्लॉटिंग डेव्हलप करण्यासाठी परवानगी घेऊनच खाजगी मालमत्तेवरील वृक्षांची तोड करण्यात आली आहे.या घटनेनंतर काही तथाकथित बोगस स्थानिक नागरिक या वृक्ष तोडीबाबत चुकीची माहिती देऊन व संग्रहित फोटो व्हायरल करून नागरिकांची व शासनाची दिशाभूल करत हे खाजगी मालमत्तेवरील वृक्ष तोड ही कायदेशीर असल्याची माहिती हाजी कदीर खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी हाजी जाकिर कुरेशी, बब्बु शेठ उपस्थित होते.
या सर्व आरोपांना उत्तर देताना हाजी कादिर शेठ यांनी स्पष्ट केले की,सदर वृक्षांची तोड पूर्णपणे कायदेशीर असून, संबंधित अधिकाऱ्यांची आणि वन विभागाची आवश्यक परवानगी घेऊनच ही कारवाई करण्यात आली आहे.आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही.शासन नियमांचे पालन करूनच झाडतोड केली गेली आहे,असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“झाडे वृद्ध व धोकादायक अवस्थेत होती”
ते पुढे म्हणाले की, “टोणगाव शिवारातील सुंदरबन या जागेवर असलेली काही झाडे वृद्ध आणि धोकादायक अवस्थेत होती. नियोजनबद्ध विकासासाठी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने ही झाडतोड करणे आवश्यक होते. काही व्यक्तींनी या बाबतीत गैरसमज करून खोटे अर्ज दाखल केले आहेत. मात्र प्रत्यक्षात आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच ही कारवाई केली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत परवानगीपत्रे सादर
पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांनी या विषयावर अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी हाजी कादिर शेठ यांनी झाडतोडीशी संबंधित परवानगीपत्रे, वन विभागाकडील कागदपत्रे आणि अधिकृत दस्तऐवज पत्रकारांसमोर सादर केले. त्यामुळे झाडतोडीची कारवाई नियमांनुसार आणि प्रशासनाच्या परवानगीनेच झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, स्थानिक प्रशासनाकडूनही या प्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू असून, झाडतोडीची प्रक्रिया नियमांनुसार पार पाडण्यात आल्याचे प्राथमिक निष्कर्षात स्पष्ट झाले असल्याची माहिती दिली आहे. सदर याबाबत काहींनी या वृक्षतोडीबाबत रस्त्याने जाणारे ट्रॅक्टरचा संग्रहित फोटो व्हायरल केला तो फोटो दिशाभूल करणारा आहे. अशी माहिती यावेळी हाजी जाकीर कुरेशी यांनी दिली. तसेच याबाबत वृक्षतोड व जमिनी बाबत नगरपालिका व वन विभाग यांच्याकडे पूर्व परवानगी व पेपर नोटीस देऊनच ही कारवाई करण्यात आलेली आहे यावेळी संपूर्ण शासनाच्या देखरेखीखालीच ही कारवाई झालेली आहे असे बब्बू शेठ यांनी यावेळी सांगितले.






