भडगाव, टोणगाव, कराब शेत शिवारातील पिकांचे नुकसान करणाऱ्या मोकाट जनावरांचा त्वरीत बंदोबस्त करावा

भडगाव, टोणगाव, कराब शेत शिवारातील पिकांचे नुकसान करणाऱ्या मोकाट जनावरांचा
त्वरीत बंदोबस्त करावा
अन्यथा भडगाव तहसील कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा
तहसीलदारांना शेतकऱ्यांचे लेखी निवेदन
भडगाव- प्रतिनिधी
भडगाव व टोणगाव शेत शिवारामध्ये शेतकऱ्यांनी शेतामध्ये जीवाचे रान करून आपली वेगवेगळ्या प्रकारची पिके ही शेतांमध्ये लावली लागवडीपासून ते पिके काढण्यापर्यंत शेतकरी रामराव राबवून पिकांचे संगोपन करतो. यात नैसर्गिक आपत्ती राहो की शेतातील पिकांचे नुकसान तो सहन करतो परंतु गेल्या पाच ते सहा वर्षांपासून भडगाव व तोंडगाव शिवारामध्ये भडगाव शहरातील काही नागरिकांनी मोकाट जनावरे (गाय, बैल, व इतर पाळीव प्राणी) असे मोकाट सोडले असून हे मोकाट जनावरे शेत शिवारांमध्ये लावलेले पिकांचे अतोनात नुकसान करत आहे तरी या मोकाट फिरणारा जनावरांचा बंदोबस्त त्वरित करावा. अन्यथा सर्व शेतकरी मिळून भडगाव तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे आज तहसीलदार श्री शितल सोलाट यांना शेतकऱ्यांनी दिले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,
भडगाव, टोणगाव, कराब शिवारात आमच्या शेतजमिनी आहेत. सदर शेतजमिनी कसुन आम्ही आमचा व आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. भडगाव शहरातील काही लोकांकडे सुमारे २५० ते ३०० गाय, बैल व इतर पाळी प्राणी असून ते पाळी प्राणी मोकाट सोडुन देतात. सदरचे मोकाट जनावरे कळपाकळपाने रात्री एकत्र येऊन शेतातील पिकांची नासुधुस करुन पिके बरबाद करतात. हा प्रकार सुमारे ५ ते ६ वर्षापासुन सुरु असुन आम्ही शेतकरी दिवसभर शेतात काम करुन रात्री पुन्हा सदर मोकाट जनावरांपासुन शेतातील पिकांचे सरंक्षण करण्यासाठी शेतात जाऊ शकत नाही.
सदर मोकाट जनावरांचे मालक गावातील असुन अशा मालकांना आम्ही प्रत्यक्ष त्यांचे घरी जाऊन भेटलो व विनंती केली की, तुमचे मोकाट जनावरे रात्री आमच्या शेतात जाऊन हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान करतात त्यामुळे आमचे आतोनात नुकसान होते. तुम्ही तुमची मोकाट फिरणारे जनावरे बांधुन ठेवा. असे सांगितल्यावर ते आमच्याशी अरेरावीची भाषा वापरून धमकी देतात की, आम्ही जनावरे बांधणार नाही, ते असेच मोकाट फिरतील. तुमच्याने जे होईल ते करून घ्या. अशा प्रकारे दादागिरीची भाषा वापरून धमकी देतात.
तरी आपण सदरील मोकाट फिरणारे व पिकांचे नुकसान करणाऱ्या जनावरांचा मालकांना प्रत्यक्ष बोलावुन त्यांना त्यांच्या जनावरांना बंदिस्त करण्याची ताकीद द्यावी जेणेकरुन आमच्या पिकांचे नुकसान होणार नाही व अशा मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा व त्यांच्या बेफीकर मालकांचा बंदोबस्त ताबडतोब करावा व आमच्या पिकांचे होणारे नुकसान थांबवावे.तसेच सदर मोकाट जनावरांवर ८ दिवसात बंदोबस्त न झाल्यास आम्ही भडगाव, टोणगाव, कराब शिवारातील रहिवाशी व शेतकरी भडगाव तहसिल कार्यालय भडगाव येथे आमरण उपोषणास बसू याची नोंद घ्यावी. असे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले. सदर निवेदनाच्या प्रतीपोलीस निरीक्षक,मुख्याधिकारी नगरपरिषद,यशवंत सहकारी पिक सरंक्षण संस्था,भडगाव,
उपविभागीय अधिकारी सो. पाचोरा भाग,बजरंग दल शाखा भडगाव आदींना देण्यात आल्या असून निवेदनावर रमेश शिरसाट, सुरेश पाटील, संतोष महाजन,प्रल्हाद पाटील,भिकनूर पठाण, दिलीप सहस्रबुद्धे, आधार पाटील, संतोष महाजन, रामचंद्र भोई,सुरेश सोनार, विजय महाजन, भगवान मालचे, श्रावण पाटील, अरुण पाटील,आयुब पिंजारी, दत्तू पाटील,भगवान पाटील,रवींद्र फुलविरे,रामचंद्र भोई ,आदींच्या सह्या आहेत






