छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ भडगाव तालुक्यात ४० दिवसांचा “बलिदान मास” पाळण्यास सुरुवात

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ भडगाव तालुक्यात ४० दिवसांचा “बलिदान मास” पाळण्यास सुरुवात
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भडगांव विभागाच्या वतीने सामूहिक मुंडण.
भडगाव प्रतिनिधी
यंदा भडगाव तालुक्यात बलीदान मास पाडळण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी शंभूमहाराजांची पुण्यतिथी फाल्गुन अमावस्या २९ मार्च २०२५ रोजी साजरी करण्यात येणार असून संभाजी महाराजांच्या बलिदानाबद्दल धारकरी दरवर्षी बलिदान मास पाळतात. यंदा भडगाव तालुक्यात बलिदान मास पाळण्यास सुरुवात आज पासून झाली आहे. तरुणांमधील वाढेत नैराश्य, व्यसनाधीनता कमी करणे हे यंदाच्या बलिदान मासाचे उद्दिष्ट आहे. बलिदान मास हा संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या ४० दिवस आधी पाळला जातो. .
औरंगजेबाने छत्रपती शंभुराजांना ४० दिवस वेदना देऊन हत्या केली. महाराजांची या महिन्यात जाणीव रहावी. म्हणून आवडीच्या वस्तूं गोड पदार्थांचा त्याग केला जातो.
या कालावधीत संपूर्ण महिना सुखाचा त्याग करीत सूतकाचा महिना पाळला जातो. या दरम्यान, ४० दिवस गोड खायचे नाही. पायात चप्पल घालायचे नाही. जमिनीवर झोपायचे. अशा कृतीतून श्रदांजली व बलिदान मास पाळला जातो. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, युवती, महिला शिवप्रेमीसह धारकांनी यामध्ये सहभागी व्हावे. आणि रोज अभिवादन सभेला उपस्थित राहावे. असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भडगांव विभागाच्या वतीने केले आहे.
सध्या तरुणांच्यात परिक्षा, नोकरी, व्यवसाय, अपेक्षा, आजारपण यातून आलेले नैराश्य, विविध प्रकारची व्यसनाधीनता झटकण्यासाठी बलिदान मास हे प्रभावी आहे. धर्मवीर बलिदान मास हिंदू समाजाला अंतरमुख करणारा, क्लेशकारक, दुःखदायक मास आहे. छत्रपती शंभू महाराज यांच्याएवढे दुःख आपल्या जीवनात नाही. या बलिदान मास यातून देशासह प्रगतीला आणि कुटुंबिक जीवन आनंदी जगण्यासाठी सुरू करण्याची हीच वेळ आहे. याकाळात तरुणांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहासाचे वाचन करावे.
छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी बलिदान दिले. त्यांचे हे बलिदान आजच्या तरुण पिढीला समजावे, यासाठी बलिदान मास महत्त्वपूर्ण आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भडगांव विभाग व संपूर्ण तालुक्यात २८ फेब्रुवारी ते २९ मार्च २०२५ पर्यंत ४० दिवस बलिदान मास पाळण्यात येणार आहे. या काळावधीत दररोज सात वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि स्मरण करण्यात येईल.