Detection

मालवाहूच्या ११ बॅटरी चोरणारे दोघे २ तासात जेरबंद, भडगाव पोलिसांची कामगिरी 

महा पोलीस न्यूज । सागर महाजन । भडगाव शहरातील शेतीच्या मालाची वाहतूक करणारे आयशर गाडी व ट्रॅक्टर हे रात्रीच्या वेळी ग्रीन पार्क कॉलनीमध्ये उभी असताना ग्रीन पार्क मधीलच दोन चोरट्यानीं तब्बल अकरा वाहनांच्या मोठ्या बॅटरी चोरल्याची घटना भडगाव शहरात दि.२१रोजी मध्यरात्री घडली आहे. याबाबत भडगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू झाला असून मालवाहतूक गाडी धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत त्वरित भडगाव पोलिस पो.कॉ.प्रविण परदेशी,अमजद पठाण यांनी दोन तासातच दोघंही आरोपींनी मोठया शिताफीने पकडुन जेरबंद केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी-नासिर खान रशिद खान (वय ५२) धंदा-ड्रायव्हर रा. ग्रीन पार्क कॉलनी भडगाव त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ग्रीन पार्क कॉलनी येथे आयशर गाडी व ट्रॅक्टर हे दि.२१रोजी रात्री लावलेले होते. यावेळी मध्यरात्री कॉलनीतील दोन चोरटयांनी लबाडीच्या इराद्याने आयशर गाडी व ट्रॅक्टर नऊ गाड्यांमधील मधील वेगवेगळ्या एक्साईड कंपनीची अकरा बॅटरी एकूण ५३,००० रु किमतीच्या
चोरुन नेल्या होत्या.

याबाबत सकाळी भडगाव पोलीस स्टेशनला या सर्व वाहनांच्या मालकांनी एकच गर्दी केली होती.यावेळी भडगाव पोलीस स्टेशनचे पो.कॉ.प्रवीण परदेशी व अमजद पठाण यांनी सदर तपास चक्र फिरवत दोन तासातच आरोपींना तात्काळ जेरबंद बंद केले. या बाबत फिर्यादी नासिर खान रशिद खान (वय ५२) धंदा-ड्रायव्हर रा. ग्रीन पार्क कॉलनी भडगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी समीर शेख ऊर्फ मुन्ना, शोएब शेख दोन्हीही रा.ग्रीन पार्क कॉलनी भडगाव या दोघांविरुद्ध विरुध्द भडगांव पोलीस स्टेशन गु.र.न.२३५/२०२५. भा.न्या.स.२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रदिप चौधरी हे करीत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button