महसूल विभागाने जप्त केलेले अवैध वाळूचे डंपर काही तासातच पळवले

भडगाव- प्रतिनिधी : भडगांव तालुक्यात गिरणा नदी पात्रातून रात्री सर्रास अवैध वाळू उपसा करून अवैध वाळू डंपर द्वारे वाहतूक करतांना भडगाव महसूल विभागाला तालुक्यांतील गिरड येथे एम एच १५ एच डब्ल्यू ८६९९ या नंबरचा डंपर आढळला हा डंपर पथकाने पकडुन भडगाव तहसील कार्यालय आवारात पुढील कारवाई साठी जप्त केला. परंतु या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या शिरपूर येथील वाळू माफियाने काही तासांतच (रात्रीतूनच) तहसील कार्यालय समोर लावलेले डंपर पळवले या बाबत महसूल विभागाचे पथक भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सूरू असल्याचे सांगितले या वेळी मंडळ अधिकारी दिनेश येंडे, ग्राम महसूल अधिकारी सुनिल मांडोळे, व्ही सि. पाटील,दिपक पाटील,राहुल माळी, शुभम चोपडा,चेतन बैरागी,महसूल सेवक राजू थोरात, माधव सोनवणे, राजेंद्र शेवरे, पोलिस कॉ.बोरसे आदी उपस्थित होते. सदर डंपर महसूल पथकाने भडगाव तहसील कार्यालय आवारात लावून सुद्धा बाहेरगावच्या वाळू माफी यांची इतकी हिम्मत वाढली आहे की तो शासकीय कार्यालयात जमा झालेला डंपर पळून नेल्याची मजल मारली आहे. याबाबत भडगाव तहसील कार्यालयातून असे अनेक प्रकार घडले असून मागच्या महिन्यात ट्रॉली घार झाली होती तसेच काही दिवसांपूर्वी एक ट्रॅक्टर येथून गायब झाले होते. याबाबत भडगाव महसूल विभाग ठोस पाऊल का उचलत नाही. तसेच जप्त केलेले वाहन जर पळवले जात असेल तर त्यांच्यावर त्वरित गुन्हे का दाखल करत नाही. सदर प्रकरणी प्रांताधिकारी भूषण अहिरे व तहसीलदार श्रीमती शितल सोलाट यांनी असे गंभीर प्रकार घडत असून दुर्लक्ष का करत आहेत. असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.






