वाळू चोरटे-तलाठ्यांमध्ये थरार, वाळू चोरट्यांकडून शिवीगाळ, मारहाण
१२ जणांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

महा पोलीस न्यूज । सागर महाजन । भडगाव महसूल विभागातील पथक हे काल रात्री गस्तीवर असताना भडगाव शहराजवळील घोडदे येथे अवैध वाळू वाहतूक करताना त्यांना ट्रॅक्टर दिसले यावेळी त्यांनी त्याला विचारणा केली असता त्याकडे कुठलाही परवाना नव्हता. वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर भडगाव तहसील कार्यालयाला आणत असताना घोडदे येथील बाबाच्या दर्ग्याजवळ तलाठ्यांच्या डोळ्यावर व चेहऱ्यावर वाळू फेकत दहा ते बारा जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एक जण पोलिसांच्या ताब्यात असून बाकी वाळू माफिया फरार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी कुणाल सुकदेव कोळी वय-४० धंदा- मंडळ अधिकारी भडगांव रा.राजीव गांधी कॉलनी,पाचोरा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२३ रोजी रात्री १२.४० चे सुमारास मी तसेच मेहमुद जब्बार खाटीक ग्राम महसुल अधिकारी भडगांव-२, प्रशांत भिका कुंभारे ग्राम महसुल अधिकारी टोणगांव-२ विशाल साहेबराव सुर्यवंशी ग्राम महसुल सेवक वाक,असे तहसील कार्यालय भडगाव येथुन अवैध वाळु वाहतुक कारवाईसाठी खाजगी वाहनाने रवाना झालो व जुना पिंपळगांव रस्त्यावरील घोडदे भागातील नदी पात्राजवळ गस्त करीत असतांना गिरणा नदीतून एक विना क्रमांकाचे निळ्या रंगाचे सोनालीका कंपनीचे ट्रॅक्टर व वाळुने भरलेली ट्रॉली व त्याच्या पाठीमागे एक विना क्रमांकाचे निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व वाळुने भरलेली ट्रॉली त्यात सुमार प्रत्येकी एक एक ब्रास वाळु भरुन वाहतुक करीत असतांना आढळुन आले.
धक्काबुक्की करून केली मारहाण
पथकाने दोन्ही ट्रॅक्टर थांबवुन दोन्ही ट्रॅक्टरांवरील चालकांना वाळु वाहतुक परवाना बाबत विचारपुस केली असता त्यांनी कोणताही परवाना नसले बाबत सांगीतले. दोन्ही चालकांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सांगीतले नाहीत. सदर बेकायदेशीर वाळु वाहतुक करीत असलेले दोन्ही ट्रॅक्टर पुढील शासकीय कारवाई साठी तहसिल कार्यालय भडगाव येथे आणत असतांना घोडदे बाबा दर्गा जवळ दहा ते बार लोक आले व येवुन त्यांनी एका ट्रॅक्टरवर बसलेले ग्राम महसुल अधिकारी प्रशांत भिका कुंभारे यांच्या चेह-यावर जमलेल्या ईसमांपैकी कोणतरी वाळु फेकली व दूस-या ट्रॅक्टरवर बसलेले ग्राम महसुल सेवक विशाल सुर्यवंशी यांना ट्रॅक्टर वरुन ओढुन खाली ओढले व त्यानंतर त्यांनी आम्हाला धक्का बुक्की व शिवीगाळ करुन रस्त्याच्या कडेला ढकलुन दिले व त्यांचे पैकी एकांने ग्राम महसुल अधिकारी मेहमुद जब्बार खाटीक यांना दोघे हाताने कवळीत पकडुन धरुन ठेवले तसेच त्यांना चापटाबुंक्यांनी मारहान केली.
दोन्ही ट्रॅक्टर पळवले, शासनाचे नुकसान
हल्लेखोरांनी दोन्ही ट्रॅक्टरमधील वाळु रस्त्याच्याकडेला हायड्रोलीक करुन दोन्ही ट्रॅक्टर खाली करून पळवुन घेवुन गेले. त्यांनतर लागलीच तेथे पोलीस मदत आली पोलीसांची गाडी येतांना बघून त्याठिकाणी जमलेले लोक पळून गेले. त्यातील एक ईसमास थांबवुन आम्ही पोलीसांच्या ताब्यात दिला. पोलीसांनी आमच्या समक्ष सदर ईसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव पंडीत पाटील रा.यशवंतनगर भडगांव असे सांगीतले. त्याला पळालेल्या ईसमांची नावे विचारली असता त्याने सोनु सुरवाडे रा. पुणगांव ता.पाचोरा असे एकाचे नाव सांगीतले व बाकी अज्ञात ईसमांची नाव गाव माहीती नसेल बाबत सांगीतले. ईसमास पुढील कारवाई साठी पोलीसांनी ताब्यात घेतला. तरी सदर इसमांनी सरकारी मालमत्तेची चोरी केली असुन त्यावर कारवाई करणारे पथकास शासकीय कामकाज करीत असतांना अडथळा निर्माण करुन शासनाचे नुकसान केले. दोन्ही ट्रॅक्टर व ट्रॉली पळवून नेले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के हे करीत आहेत.