Crime

भडगाव तहसीलदार कार्यालयाच्या आवारात तलाठी व वाळू व्यवसायिकामध्ये जुंपली !

दोघांमध्ये समेट घडवून आणणारा पोलीस कोण? याची चर्चा

महा पोलीस न्यूज । दि.६ मार्च २०२५ । भडगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात दिनांक ४ रोजी सायंकाळी साडेआठ वाजे दरम्यान भडगाव तहसील कार्यालयात एक तलाठी व वाळूमाफिया यांच्यात कार्यालय प्रांगणात आर्थिक कारणावरून बाचाबाची व वाद झाल्याची जोरदार चर्चा आहे.

वादानंतर तलाठी व वाळूमाफियाने “तेरी भी चूप और मेरी भी चूप” असे म्हणून दोघांनी एकमेकांची माफी मागत विषय संपवल्याची खमंग चर्चा भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू आहे. दरम्यान, वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करणारा पोलीस कर्मचारी कोण? याबाबत सुद्धा चर्चा रंगू लागली आहे. सदर प्रकार हा देवाण-घेवाण वरून घडल्याची चर्चा आहे.

कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याबाबत वाद निर्माण झाल्यास त्याची नोंद घेणे, वरिष्ठांना कळवणे आणि पोलीस तक्रार नोंदवणे हे आवश्यक असते मात्र याठिकाणी तसे काही झाल्याचे दिसून येत नाही. याप्रकरणी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button