Crime

भडगाव तहसील परिसरातील पळवलेल्या अवैध वाळू डंपर मालकावर शेवटी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल 

भडगाव पोलिसांच्या पथकाने रात्रीतूनच पळवलेले डंपर केले जप्त 

भडगाव- प्रतिनिधी : भडगाव तालुक्यातील गिरड येथे महसूल पथकाने दि.२३ रोजी मध्यरात्री अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले. ते डंपर मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात लावून ताब्यात घेतले होते. परंतु महसूल विभागाच्या ताब्यातील डंपर शिरपूर येथील डंपर मालक याने काही तासातच (सकाळी पाच वाजे सुमारास)तहसील कार्यालयाच्या आवारातून पळून नेले होते.या संबंधित दै. महा पोलीस न्यूजने तत्काळ तहसील आवारातून डंपरची पळवा पळवी या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करताच भडगाव महसूल विभाग खडबडून जागे झाले व त्या डंपर मालका विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पळविलेले डंपर सुद्धा पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी-चेतन गोविंद बैरागी -ग्राम महसुल आधिकारी कजगांव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,

दि.२३ रोजी रात्री. मी व पथकातील आठ ते दहा जण खाजगी वाहनाने अवैध गौण खनिज (वाळु) वाहतुक करणान्या वाहनांवर कारवाई करणेकामी गस्त घालत असतांना आमचे पथकाने रात्री १२ वाजेच्या सुमारास पिंपरखेड जवळ अंजनविहरे फाटा येथे अवैध गौण खनिज वाळु वाहतुक करणारे वाहन (डंपर) आढळुन आल्याने सदर वाहनास आम्ही थांबवुन सदर वाहनाचे चालकास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक पाटील वय ५३ वर्ष,रा.ता.शिरपुर जि.धुळे असे सांगितले व सदर वाहन मालकाचे नाव विचारले असता त्याने रोहीत पवार रा.शिरपुर जि.धुळे असे असल्याचे सांगितले वरून सदर वाहनावर जावुन डोकावुन बघितले असता तिच्यात अंदाजे ७ बास बाळू असल्याचे दिसुन आले त्यानंतर त्याचेकडे वाळु वाहतुकीचा परवाना असलेबाबत विचारले असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. सदर चालकाचे ताब्यात असलेले वाहनाच एक निळ्या रंगाचे टाटा कंपनीचे डंपर त्याचा क्रमांक एम एच १५एच डब्लु ८६९९असा असलेले त्याचा चेचिस कं. MAT७७७०१२N३B०३८२९ असा असलेले १२ टायर डंपर जु.वा.कि.अं,(तिस लाख रु.किमतीचा),२)३३०८२/- रु किंमतीची ७ ब्रास वाळुची

वाहन मुद्देमालासह पुढील कार्यवाहीकामी तहसिल कार्यालयात आणले असता तहसिल कार्यालयात दि.२६/१/२०२६ रोजीचा कार्यक्रम असल्याकारनाने तहसिल आवाराच्या बाहेर लावले व सदर वाहनाचा पंचनामा मंडळ अधिकारी दिनेश येंडे यांनी करून सदर वाहन चालकास सदर वाहनाचे चाबी मागितली असता चालक हा चाबी घेवुन पळून गेला असल्याने आम्ही आमच्या पथकातील राजु थोरात यांना सदर वाहनावर लक्ष ठेवण्याचे सांगितले व त्यानंतर आमचे पथक पुढील गस्तीसाठी रवाना झाले. त्यानंतर दि.२४ रोजी सकाळी ४.३०ते ५.३० वाचे दरम्यान आम्ही गस्त घालुन तहसिल कार्यालय भडगाव येथे परत आलो असता जप्त केलेले वरील वर्णनाचे

वाहन आम्हाला दिसुन आले नाही.त्यानंतर आम्ही सदर कोतवाल नामे राजु थोरात यांना सदर डंपर बाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की,बाजुला गेलो असता तो पर्यंत सदर चालक हा डंपर तेथुन पळवुन घेवुन गेला होता व त्यानंतर आम्ही आजु बाजुच्या परिसरात शोध घेतला असता ते मिळुन आले नाही. म्हणुन आमची खात्री झाली की, वरील वर्णनाचे डंपर हे वाहनचालक अशोक पाटील यांनी वरीष्ठांच्या विना परवानगीने चोरुन घेवुन गेल्याने माझी सदर वाहनावरील चालक अशोक पाटील, रा.ता.शिरपुर जि.धुळे व सदर वाहन मालक रोहीत पवार रा.शिरपुर जि.धुळे यांच्याविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गु.र.न १७/२०२६ भारतीय न्याय संहिता (बी एन एस),२०२३

कलम ३०३(२),महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६,४८(७),

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६,४८(८)(१),प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.काँ.प्रदीप चौधरी हे करीत आहे.सदर पळविलेले डंपर वर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्वरित भडगाव पोलीस स्टेशनचे पो.कॉ.प्रवीण परदेशी,पो.हे.कॉ.गोवर्धन बोरसे मनोहर पाटील,महेंद्र चव्हाण, यांची टीम शिरपूर कडे रवाना झाली होती.त्या ठिकाणाहून डंपरचा मुद्देमाल जप्त करत आज सकाळी सहा वाजेच्या दरम्यान डंपर भडगाव पोलीस स्टेशन मध्ये जप्त करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button