भडगाव तहसिल कार्यालय व पोलिस स्टेशन परीसराने घेतला मोकळा श्वास
२६ जानेवारीनिमित्त परीसरात स्वच्छता ; जप्त वाहनेही स्थलांतरीत

भडगाव तहसिल कार्यालय व पोलिस स्टेशन परीसराने घेतला मोकळा श्वास
२६ जानेवारीनिमित्त परीसरात स्वच्छता ; जप्त वाहनेही स्थलांतरीत
भडगाव I प्रतिनिधी
२६ जानेवारीचे औचित्य साधत येथील तहसिल कार्यालयात लावलेली अवैध वाळु वाहतुक करणारे ट्रॅक्टर, डंपर इतर दुसऱ्या जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहेत.तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन परीसरही नगर परीषदेच्या सफाई कर्मचार्यांमार्फत परीसर स्वच्छ करण्यात आला आहे.
तहसिल कार्यालयाचे आवार मोकळे श्वास घेत असुन शासकीय कार्यालयात विविध कामांसाठी येणार्या जाणार्या नागरीकांसह वृद्ध मंडळींना वापरण्यास सोयीचे ठरत आहे. यामुळे नागरीकातुन समाधान व्यक्त केले जात आहे. ही स्वच्छता मोहिम दि. २२ रोजी सकाळी राबविण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी कि, येथील तहसिल कार्यालयात अवैधरित्या वाळु वाहतुक करणारे ट्रॅक्टर , डंपर आदि महसुल प्रशासनाने कार्यवाही करुन ही वाहने जमा करण्यात आल्यामुळे वाहनांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे तहसिल कार्यालयात शासकीय वाहनांसह , अधिकारी, कर्मचार्यांना, नागरीक, वृद्ध मंडळींना वापरण्यासाठी अडचणीतुन मार्ग काढावा लागत होता.
तहसिल कार्यालयात वापरण्यासाठी चक्का जाम होतांना नेहमी दिसुन येत होता. यापुर्वी दै. लोकशाही ने जप्त केलेल्या वाहनांनीच अडवला तहसिल कार्यालयाचा रस्ता. या आशयाचे वृत्तही लावले होते. आता २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन जवळ आल्यामुळे तहसिल कार्यालयातील जमा केलेले अवैध वाळु वाहतुक करणारे ट्रॅक्टर व ढंपर आदि वाहने तहसिल कार्यालयातुन इतर जागेंवर स्थलांतरीत करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तहसिल कार्यालयाचा आवारातील परीसर मोकळा श्वास घेत आहे.
नगर परीषदेच्या सफाई कर्मचार्यांकडुन तहसिल कार्यालय परीसर, पोलीस स्टेशन परीसर स्वच्छ करण्यात आला आहे. नगर परीषदेच्या घंटागाडीवर परीसरात स्वच्छ केलेली घाण, माती, कचरा टाकुन नेण्यात आला आहे. त्यामुळे तहसिल कार्यालय परीसरात नागरीकांना वापरण्यास सोयीचे झाल्याचे दिसुन आले. शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनाही वापरण्यास सोयीचे ठरत आहे. तहसिल कार्यालयातील आवार मोकळा व चकाचक झाल्याने नागरीकातुन समाधान मानले जात आहे