महाराष्ट्र योगशिक्षक संघाची भुसावळ तालुका कार्यकारिणी जाहीर
महा पोलीस न्यूज | १० जून २०२४ | महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या भुसावळ तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या भुसावळ तालुकाध्यक्षपदी शिला रावत यांची निवड करण्यात आली आहे. शनिवारी ८ जून रोजी कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल गुरव यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते निवड झालेल्या सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
योगाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाभरात विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. गेल्या महिन्यात जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. आता तालुका कार्यकारिणी जाहीर करण्याबाबत शनिवारी ८ जून रोजी भुसावळ शहरातील प्रल्हाद नगरातील रामेश्वर मंदीरात बैठक घेवून जाहीर करण्यात आले. याप्रसंगी मु.जे.महाविद्यालयाचे योग विभागाचे प्राचार्य डॉ.देवानंद सोनार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल गुरव, उपाध्यक्षा ॲड. स्वाती निकम, महासचिव पांडूरंग सोनार, जिल्हा कोषाध्यक्ष नूतन जोशी यांच्या आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत भूसावळ तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात तालुकाध्यक्षपदी शिला मनोजकुमार रावत, उपाध्यक्ष प्रांजली प्रसाद अंबेकर, सह सचिव संध्या धिरेंद्र सोनी, कोषाध्यक्ष मनोज कुमार रावत, संघटन सचिव मधुकर सोपान राऊत, सोशल मिडीया प्रभारी प्रसाद अमरेंद्र अंबेकर, कार्यालय सचिव यश प्रसाद अंबेकर सचिवपदी दीपश्री दत्तात्रेय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवड झालेल्या सदस्यांना मान्यवरांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला योग साधव, योग शिक्षक आदीची मोठ्या संख्येने उपस्थित होते.