जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार बाबा काल्याला फैजपुरात ठोकल्या बेड्या !!
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार बाबा काल्याला फैजपुरात ठोकल्या बेड्या !!
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव: भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर अटक केली आहे. हा आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता.
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ७ मे २०२५ रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आशिक बेग असलम बेग ऊर्फ बाबा काल्या (रा. खडका रोड, भुसावळ) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल आणि रवी नरवाडे यांच्या पथकाने तपास सुरू केला.
२७ ऑगस्ट २०२५ रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी आशिक बेग फैजपूर येथील हॉटेल हॉटस्पॉट येथे थांबला आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फैजपूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि फैजपूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि शरद बागल, रवी नरवाडे यांच्यासह पोलीस हवालदार गोपाळ गव्हाळे, उमाकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आणि फैजपूर पोलीस ठाण्यातील सपोनि रामेश्वर मोताळे, पोउपनि मैनुद्दीन सैय्यद आणि पोकॉ जुबेर शेख यांचा सहभाग होता.






