Crime

बिबट्याने नऊ वर्षीय बालकाला शेतात फरपटत नेत केले ठार !

तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारातील घटना

नंदुरबार (प्रतिनिधी) :– मचान वरून शेतात घरी जाणाऱ्या नववर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करून त्याला फरपटत शेतात घेऊन त्याला ठार केल्याची दुर्दैवी घटना तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारात घडली. अनिल करम सिंग तडवी मुळगाव सरदार नगर वय 9 असे मयत मुलाचे नाव आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की दलेल पूर येथे गावाजवळ शेतात घर करून राहणाऱ्या एका शेतमजुराच्या नऊ वर्षीय मुलगा हा सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेतातील मचान वरून घरी परत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक अचानक हल्ला करून त्याला उचलून नेत शेतात नेले.

हा प्रकार काही जणांच्या लक्षात आला नंतर त्यांनी आरडा ओरड केली त्यामुळे बिबट्या पळून गेला . मुलाचा शोध घेतला असता तो रक्त बंबाळ अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉ. संजय पाटील यांनी मृत घोषित केले.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयात सरदार नगरचे सरपंच रमेश तडवी, यांनी परिवाराचे सांत्वन केले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button