जळगावात ७० किलो गोवंश मांसासह रिक्षाचालक जेरबंद; एम.आय.डी.सी. पोलिसांची कारवाई!

जळगाव– भुसावळ रोडवर स्वामी नारायण मंदिराजवळ एम.आय.डी.सी. पोलिसांनी मोठी कारवाई करत एका रिक्षाचालकाला ७० किलो गोवंश मांसासह रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.२५ वाजेच्या सुमारास, दूरदर्शन टॉवर परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळून एक संशयास्पद रिक्षा (क्रमांक MH.19 V.7745) जात होती. पोलिसांनी या बजाज रिक्षाची तपासणी केली असता, त्यात गोवंश जनावरांची कत्तल करून विक्रीच्या उद्देशाने नेले जाणारे सुमारे ७० किलो मांस आढळून आले.
आरोपीवर गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शेख जमीर मेहबूब (वय ५४, रा. उस्मानिया पार्क, शिवाजी नगर, जळगाव) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरुद्ध एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम ५, ५(क), ९, ९(अ) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ०८३/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या मोहिमेत खालील पोलीस कर्मचारी सहभागी होते:
* पोहेकाँ/२९२२ रामदास कुंभार (तपास अधिकारी)
* पोहेकाँ/९११ गिरीष पाटील
* सफौ/०५ विजयसिंग पाटील
* पोना/१० प्रदिप चौधरी
* पोकाँ/१२९५ विनोद आस्कर
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार रामदास कुंभार करत आहेत.





