मोठी बातमी : २ गावठी कट्ट्यांसह एकाला पकडले
महा पोलीस न्यूज । दि.२७ जुलै २०२४ । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दमदार कामगिरी करीत एकाला दोन गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतूससह पकडले आहे. वरणगाव येथून तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून हरीश उजलेकर असे तरुणाचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख हे वरणगाव शहरात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहितीच्या आधारे बातमी मिळाली की, वरणगाव शहरातील आंबेडकर नगर येथील हरिष उजलेकर याच्या गावठी कट्टा आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी लागलीच प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, उदय कापडणे, रविंद्र चौधरी अशांचे पथक तयार करून तात्काळ हरिष उजलेकर, आंबेडकर नगर वरणगाव याची माहिती घेवून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
पथकाने त्यास वरणगाव शहरातून ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये २ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुस मिळून आले. याप्रकरणी वरणगाव पो.स्टे.ला शस्त्र अधिनियम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.