मोठी बातमी : ठाकरे गटाचा मोठा पदाधिकारी राजीनामा देणार!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । विधानसभा निवडणूक एक दिवसावर येऊन पोहचली असताना एक मोठी राजकीय घडामोड जळगाव शहरात होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. महा पोलीस न्यूजने त्यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका उद्या दि.२० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. राज्यातील निवडणुकांच्या अनुषंगाने यंदा महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आ.सुरेश भोळे हे तिसऱ्यांदा उमेदवारी लढवत आहेत तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी महापौर जयश्री सुनील महाजन या निवडणूक लढवत आहेत.
जळगाव जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे हे राजीनामा देण्याच्या तयारीत असून त्यांनी देखील वृत्ताला दुजोरा दिला आहे. विष्णू भंगाळे हे शिवसेनेत प्रवेश करणार असून शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्याचे समजते. निवडणुकीच्या एक दिवस अगोदर विष्णू भंगाळे यांचा पक्ष बदल महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.