मोठी बातमी : जिल्हा परिषद लिपीकने मागितली २ लाखांची लाच, एसीबी पथकाने पकडले
महा पोलीस न्यूज । दि.२१ ऑगस्ट २०२४ । सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र यावल येथे शिपाई पदावर कार्यरत असलेल्या एकाची स्थापत्य स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली होती. बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेतील लिपिकाने २ लाखांची लाच मागितली होती. तडजोडअंती १ लाख ८० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र यावल येथे शिपाई पदावर कार्यरत असलेल्या एकाची स्थापत्य स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली होती. बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपीक नरेंद्र किशोर खाचणे वय ५२ यांनी तक्रारदार यांचेकडे २ लाख रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदार यांनी याबाबत लाप्रविभाग जळगाव येथे दि.२१ रोजी तक्रार दिली होती. तक्रारीच्या दृष्टीने लाच मागणीची पडताळणी केली असता आलोसे यांनी बुधवारी पंचासमक्ष तडजोडअंती १ लाख ८० हजार रुपये लाचेची मागणी करून स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचेवर शनिपेठ पोलीस स्टेशन जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
संपूर्ण कारवाई पोलीस नाईक बाळू मराठे, पो.ना.सुनिल वानखेडे, पोकॉ.राकेश दुसाणे, पोकॉ.प्रणेश ठाकुर, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पोना किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ.सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली आहे.