Crime

बायोडिझेलची अवैध वाहतूक करणारे दोन टँकर पकडले

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

बायोडिझेलची अवैध वाहतूक करणारे दोन टँकर पकडले
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव प्रतिनिधी

एमआयडीसी पोलीसांच्या पथकाने बायोझिडेलची शहरातून अवैधपणे वाहतुक करणाऱ्या दोन टैंकचर मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीवर कारवाई करीत जप्त केले, या कारवाईत २७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात टैंकर चालकांसह त्यांच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील अजिंठा चौफुली येथे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्यासह पोलीस पथक मंगळवारी मध्यरात्री २ वाजता गस्तीवर असताना अजिंठा चौफुली येथून संशयास्पदरित्या जाणारे दोन ट्रैकर पोलिसांनी धांववले. त्यावेळी चालकांची चौकशी केली असता दोघांनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान पोलिसांनी चौकशी केली असता दोन्ही ट्रॅकरमध्ये बायोडिझेल भरलेले  आढळून आले. दरम्यान पोलिसांनी टैंकर क्रमांक (जीजे १२ बीटी ११८१) आणि (जेजे १२ बीटी ४२८४) अशी दोन्ही चाहने हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

पोलिसांनी आणलेल्या टँकरचा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करुन त्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, या दोन्ही वाहनांमध्ये मिळून एकूण २७ लाख रुपये किमतीचे बायोडिझेल असल्याचे उघडकीला आले.

याप्रकरणी पोलीस नाईक विकास सातदिवे आणि सिद्धेश्वर डापकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन बालक सद्दाम सय्यद अकबर (वय २३, रा.बच्छाव राज्य गुजरात) आणि लतीफ भाई फकीर मोहम्मद हिंगोरजा (वय २४, रा. आईचार जि. कच्छ राज्य गुजरात) यांच्यासह टँकरचे मालक ज्ञानेश्वर भारत शेजोळे (वय २९, रा.उफडी ता. बुलढाणा) आणि सुलेमान इलियास हेरेया (रा. वरसाना कच्छ राज्य गुजरात) या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button