भाजप जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.सी.चौधरी यांचे निधन

महा पोलीस न्यूज । दि.२ एप्रिल २०२६ । जळगाव जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष तसेच सृष्टी हॉस्पिटलचे संचालक डॉ. राधेश्याम चौधरी यांचे वडील सेवानिवृत्त मुख्याध्यापक धर्मराज चंपालाल चौधरी (डी. सी. चौधरी) यांचे गुरुवारी (२ एप्रिल) सायंकाळी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.
डी. सी. चौधरी यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आदर्श शिक्षक म्हणून ओळख निर्माण केली होती. त्यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक पदावर दीर्घकाळ सेवा दिली होती. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात डॉ.राधेश्याम चौधरी यांच्यासह शैलेंद्र चौधरी आणि नितीन चौधरी अशी तीन मुले, सुना व नातवंड असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार (३ एप्रिल २०२६) रोजी सकाळी १० वाजता भाटपुरा येथील निवासस्थानावरून निघणार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण करत चौधरी कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.





