Politics
पाचोरा-भडगावचे माजी आमदार दिलीप वाघ यांचा भाजपात जंगी प्रवेश

पाचोरा-भडगावचे माजी आमदार दिलीप वाघ यांचा भाजपात जंगी प्रवेश
पाचोरा प्रतिनिधी l पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी आज मुंबईत शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपाला या मतदारसंघात एक दिग्गज नेता मिळाला आहे.
काही दिवसांपासून दिलीप वाघ भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आज मुंबईत झालेल्या भव्य सोहळ्यात त्यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात अधिकृत प्रवेश केला.
यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आमदार मंगेश चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी उपस्थित होते.या सोहळ्यात दिलीप वाघ यांच्यासह त्यांचे बंधू आणि पीटीसीचे चेअरमन संजय वाघ, वाघ कुटुंबीय आणि त्यांचे अनेक समर्थक यांनी भाजपात प्रवेश केला.