CrimePolitics

११ मतदारसंघातील ४९ उमेदवारांना निवडणूक काळासाठी शस्त्रधारी अंगरक्षकाची सुरक्षा

जळगाव : विधानसभा निवडणुकीत निवडणूक लदविणाऱ्या जिल्ह्यातील ११ मतदारसंघातील ४९ उमेदवारांना निवडणूक काळासाठी शखधारी अंगरक्षकाची सुरक्षा पुरविली जाणार आहे. गाबाबतचा निर्णय जिल्हास्तरीय समितीने घेतला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात निवडणूक काळात झालेल्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या जिल्हास्तरीय समितीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या जीवीताला असलेल्या घोक्याबाबत तपासणी करून एक शखधारी अंगरक्षक पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यात जिल्ह्यातील ११ मतवारसंघातील ४९ उमेदवारांना अशा प्रकारची सुरक्षा उत्या दि. ६ पासून पुरविली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रंडी यांनी दिली. तसेच ही सुरक्षा केवळ निवडणूक काळासाठी राहणार असून भविष्यात पुन्हा सुरक्षा देण्याच्यादृष्टीने जिल्हास्तरीय समिती आवश्यक तो निर्णय घेणार असल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

यांना पुरवली जाणार सुरक्षा

चोपडा प्रा. चंद्रकांत सोनवणे, प्रभाकर सोनवणे, रावेर अमोल जावले, धनंजय चौधरी, अनिल चौधरी, दारा मोहम्मद, भुसावळ डॉ. राजेश मानवतकर, जळगाव शहर डॉ. अनुज पाटील, जयश्री महाजन, शैलजा सुरवाडे, राजूमामा भोळे, कुलभूषण पाटील, जळगाव ग्रामीण गुलाबराव देवकर, मुकुंदा रोटे, अमळनेर शिरीष हिरालाल चौधरी, डॉ. अनिल शिंदे, एरंडोल डॉ. सतीश पाटील, अमोल चिमणराव पाटील, ए.टी. पाटील, चाळीसगाव उन्मेश पाटील, मंगेश चव्हाण, पाचोरा-वैशाली सूर्यवंशी, सतीश बिन्हाडे, अमीत तडवी, प्रत्ताप हरि पाटील, मागो पगारे, अमोल शिंदे, अमोल शांताराम शिंदे, निळकंठ पाटील, मनोहर ससाणे, दिलीप वाघ, वैशाली किरण सूर्यवंशी, जामनेर दिलीप खोडपे, मुक्ताईनगर – अनिल मोरे, अनिल गंगतीरे, अॅड. रोहीणी एकनाथ खडसे, अशोक जाधव, संजय ब्राम्हणे, अर्जुन पाटील, ईश्वर सपकाळे, उमाकांत मराठे, रोहीणी कवडे, रोहीणी खडसे, रोहीणीताई खडसे, बंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटील, जफर अली मकसूद अली, विनोद सोनवणे आणि सुरेश तायडे यांना सुरक्षा पुरविली जाणार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button