ब्रेकिंग : बस खांबावर धडकली, शाळकरी विद्यार्थ्यांसह २८ प्रवासी जखमी
महा पोलीस न्यूज । दि.१३ डिसेंबर २०२४ । धरणगाव तालुक्यातील दोन गावाजवळील स्मशानभूमीजवळ भरधाव बसवरील ताबा सुटल्याने बस थेट वळणावर असलेल्या इलेक्ट्रिक खांद्यावर धडकल्याची घटना शुक्रवार दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता घडली आहे. ही बस लाडली येथून रेलमार्गे जळगाव येत असताना अपघात घडला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील लाडली गावात मुक्कामी असलेली बस क्रमांक एमएच.१४.बीटी.२८८७ नेहमीप्रमाणे शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता लाडली येथून शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन निघाली. पुढे रेल गावातील विद्यार्थ्यांना घेऊन पाळधीकडे येत असताना दोन गावाजवळील स्मशानभूमीच्या वळणाजवळ भरधाव बसवरील चालक अशोक जगन्नाथ पाटील वय-५६, रा.लाडली ता.धरणगाव यांचा बसवरील ताबा सुटल्याने वळणावरील जवळील इलेक्ट्रिक खांब्याला बस धडकली.
बस थेट नाल्यात गेली असती पण सुदैवाने इलेक्ट्रिक खांब्याला पुढील दुर्घटना टळली आहे. या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोनगाव लाडली, दोनगाव आणि रेल गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उतरवून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमींची नावे
मयुरी पाटील वय-१४, आधार सोनवणे वय-४५, लावण्या सोनवणे वय-११, सायली पाटील वय-१५, हर्षा पाटील वय-१३, गुंजन सपकाळे वय-१६ जनाबाई पाटील वय-५५, अजय पाटील वय-१३, कुंदन पवार वय-१३, सुनीता भिल वय-४६, काजल पाटील वय-१५, मोहिनी शारद पाटील वय-१७, भावना शांताराम पाटील वय-१६,अशोक जगन पाटील वय-५७, वालात्री शंकर शिरसाट वय-५३, कुणाल गुंजाळ पवार वय-१३, रेखाबाई विशाल दांडेकर वय-२५ सर्व रा. रेल ता.धरणगाव, जिजाबाई पंढरीनाथ पाटील वय-६२, पंढरीनाथ आत्माराम पाटील वय-६७, दोन्ही रा. लाडली ता. धरणगाव, जगन भीमराव पवार वय-४२, विश्वनाथ सदाशिव पाटील वय -७१, निखिल सुधाकर पाटील वय-२३, तन्मय मंगल पाटील वय-१९, गुंजन सुनील पाटील वय १४, विवेक छगन पाटील वय -१७, राम शरद अवचिते वय-१३, जयेश चंद्रकांत पाटील वय-१६, सायली सुरेश पाटील वय-१७ सर्व रा. रेल ता.धरणगाव