Detection

ब्रेकिंग : वरणगांव ऑर्डनन्स फॅक्टरीतून रायफल चोरणारा जाळ्यात, ए.टी.एस. पथकाने लावला शोध

महा पोलीस न्यूज । दि.४ नोव्हेंबर २०२४ । भुसावळ तालुक्यातील वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील शस्त्रागारातुन ए.के.४७ ३ व गलील ५.५६ चे २ या बंदुका चोरी झाल्या होत्या. जळगाव पोलिसांनी ३ बंदुका रेल्वे रुळावरून हस्तगत केल्या होत्या. ए.टी.एस. पथकाने गुन्ह्याचा उलगडा केला असून उर्वरित २ बंदुकांसह एकाला अटक केली आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा गुन्हा मानला जात होता.

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील शस्त्रागारातुन दि.१९ ऑक्टोबर ते दि.२१ ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी वरणगांव शस्त्रागारातुन सील तोडुन तसेच कुलूप व कडी कोयंडा तोडुन शस्त्रागारातील ए.के.४७ ३ व गलील ५.५६ चे २ या बंदुका चोरून नेले होते. त्यावरून वरणगाव पोलीस स्टेशन, ता. भुसावळ, जि. जळगाव येथे गु.र.नं.१९७/२०२४, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन अति महत्वाचा असल्याने आरोपीचा शोध घेवुन चौकशी करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे ए.टी.एस.प्रमुख, ए.टी.एस.चे आय.जी. व पोलीस अधीक्षक यांनी ए.टी.एस. नाशिक युनिटचे प्रभारी अधिकारी व जळगांव कॅम्पचे ए.टी.एस.पथक तसेच ए.टी.एस.चा तांत्रीक विभाग यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार ए.टी.एस.पथक हे दि.२३ ऑक्टोबरपासुन वरणगांव येथे ठाण मांडून बसले होते व गुन्हयाची बारकाईने व कसोशीने चौकशी करीत होते.

त्यादरम्यान चोरी झालेल्या बंदुकापैकी दि.२८ ऑक्टोबर रोजी जाडगांव जवळील रेल्वे रूळावर ३ बंदुका बेवारस स्थितीत मिळुन आल्या होत्या. तसेच गुन्हयातील चोरी गेलेल्या दोन शस्त्र AK 47 Rifle व 5.56 Ace Rifle अशा रायफली व आरोपी अदयापपावेतो मिळुन आलेले नव्हते. दि.०४/११/२०२४ रोजी पोलीस रेकॉर्डवरील आरोपींची माहिती काढुन ए.टी.एस. पथकाने गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन, गुन्हा प्रकटीकरणाचे कौशल्य वापरून यातील आरोपी नामे लिलाधर उर्फ निलेश बळीराम थाटे, वय ४३ वर्षे, व्यवसाय शेती व प्लॉट खरेदी/विकी एजंट रा.तळवेल ता. भुसावळ जि. जळगांव याचेकडे कसुन चौकशी केली असता सदर आरोपी याने गुन्हा केल्याचे कबुल केले.

संशयीत आरोपीने ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगांव येथुन चोरीस गेलेले शस्त्र AK 47 Rifle व 5.56 Ace Rifle हे पोलीसांकडे जमा केले. गुन्हयातील यापुर्वी बेवारस स्थितीत जाडगांव रेल्वे रूळावर मिळुन आलेल्या ३ रायफली हया देखील त्यानेच रेल्वे रूळावर टाकुन दिल्याचे कबुल केले आहे. गुन्हयातील आरोपी व गुन्हयात वापरलेली मोटर सायकल तसेच गुन्हयात वापरलेला मोबाईल हे सहा.पोलीस निरीक्षक, वरणगांव पोलीस स्टेशन यांचेकडेस जमा केले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास जळगांव जिल्हा पोलीस करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button