Crime

ब्रेकिंग : उमर्टीत पोलिसांवर हल्ला, एकाला बांधले, गोळीबार, मारहाण झाल्याची चर्चा

महा पोलीस न्यूज । दि.१५ फेब्रुवारी २०२५ । चोपडा तालुक्याजवळ मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या उमर्टी गावात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. कारवाई करून एकाला घेऊन येत असताना ही घटना घडल्याचे बोलले जात असून एका कर्मचाऱ्याला बांधून ठेवले तर दुसऱ्यांना मारहाण झाल्याचे समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आणि ३ कर्मचारी उमर्टी गावाजवळ मध्यप्रदेश सीमेवर अवैध बंदूक विक्रीच्या कारवाईसाठी गेले होते. एका संशयिताला ताब्यात घेऊन परत येत असताना काही लोकांनी पथकाला अडवले. दोघांमध्ये बाचाबाची झाल्याने एक पोलीस कर्मचाऱ्याला बंदूकीचा धाक दाखवत त्यांनी पकडले तर इतरांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

घटनेची माहिती पोलीस ठाण्याला मिळताच स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह इतर अधिकारी आणि मोठा ताफा त्याठिकाणी पोहचला. मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने रात्री ९ वाजेच्या सुमारास त्या कर्मचाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती समोर येत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button