Crime

ब्रेकिंग : जळगाव पोलिसांची धडक कारवाई, २ कोटींची रोकड पकडली

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून पैशांचा काळाबाजार सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे येथे ५ कोटी रुपये पकडल्यानंतर जळगावात पोलिसांनी प्रशासनाच्या सहकार्याने एकाच दिवसात १ कोटी ९० लाख ६५ हजार ४१२ रुपयांची रोकड जप्त केली आहे. प्रशासनाकडून पुढील चौकशी सुरू असून जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्हाभरात पोलिसांनी नाकाबंदी केली होती.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली असून पैशांच्या व्यवहारावर प्रशासनाची नजर आहे. दोन दिवसापूर्वी पुणे पोलिसांनी ५ लाखांची रोकड जप्त केली होती. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात ५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. सध्या सर्वत्र प्रशासन लक्ष ठेवून असून जळगावात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने मंगळवारी नाकाबंदी करण्यात आली होती.

नाकाबंदी दरम्यान, पोलिसांनी चाळीसगाव ग्रामिण पो.स्टे. हददीतील जामडी येथे लावण्यात आलेल्या एसएसटी पॉइंटवर दुपारी १ वाजेच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान नागदकडुन चाळीसगावकडे जात असलेल्या महिंद्रा वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये ७ लाख २२ हजार ५०० रोख रक्कम मिळुन आली. पोलिसांनी रक्कम जप्त केली असुन ट्रेझरी येथे जमा केली आहे.

कासोदा पोलीस स्टेशन हददीतील फरकांडे फाट्याजवळ ऑल आउट स्किम नाकाबंदी करीत असतांना एरंडोलकडून येणारी पांढऱ्या रंगाची क्रेटा ही सांयकाळी ५.४५ वाजेच्या दरम्यान थांबवून तपासणी केली असता ५०० व १०० दराच्या नोटा मिळुन आल्या. पोलिसांनी रक्कम तपासली असता १ कोटी ४५ लाख रुपये असल्याचे समजते. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

भडगाव पोलीस स्टेशन हददीतील पारोळा चौफुली भडगाव येथे नाकाबंदी दरम्यान वाहनाची तपासणी करताना १ लाख ४९ हजार रुपये रोख मिळुन आली असून सदर रक्कम पुढील कारवाईसाठी पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघातील एफएसटी पथक क्र.३ यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. जामनेर पोलीस स्टेशन हदीतील नेरी येथे नाकाबंदी दरम्यान एक इसमाच्या ताब्यातुन ४ लाख ४६ हजार १२० रुपये मिळून आल्याने ते जप्त करण्यात आलेले आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button