ब्रेकिंग : जळगावात खुनाच्या गुन्ह्यातील संशयितावर भरदिवसा प्राणघातक हल्ला

महा पोलीस न्यूज । दि.२१ फेब्रुवारी २०२५ । जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात बुधवारी सायंकाळी एका २९ वर्षीय तरुणाला भर रस्त्यावर बेदम मारहाण करण्यात आली. तरुणाचे नाव प्रतीक हरिदास निंबाळकर असे असल्याचे समजते. दरम्यान, माहितीनुसार जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून तो खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर २०२० रोजी शिवाजीनगर परिसरातील भूषण भरत सोनवणे (वय २५. रा.जुना कानळदा रोड) हा इंद्रप्रस्थ चौकात ज्ञानेश्वर काटकर, प्रतिक निंबाळकर, दुर्गेश संन्यास यांच्यासोबत रात्री अकरा वाजता उभा होता. चार ही जणात आपसात वाद झाला. यावेळी भूषणने प्रतिकच्या कानात मारल्याने प्रतिक निबांळकर, अतुल काटकर यांने चाकुने भूषणवर वार केले. खोलवर वार झाल्याने भूषणचा जागीच मृत्यु झाला होता.
गुन्ह्यात प्रतीक हरिदास निंबाळकर यास कालच न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आज तो घरी जात असताना शाहूनगर परिसरात काही तरुणांनी त्याला घेतले. लोखंडी रॉडने मारहाण करीत त्याला काही जणांनी बेदम मारहाण केली. घटना सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडली. जखमी प्रतीक यास उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याठिकाणी मोठी गर्दी जमली आहे.