Crime
ब्रेकिंग : पाळधीत तणाव.. दुकानांची तोडफोड, जाळपोळ, पोलीस फौजफाटा पोहचला

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात ३१ डिसेंबरच्या रात्री मोठा वाद निर्माण झाला असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनाच्या हॉर्नमुळे दोन गटात वाद होऊन दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी पोहचले असून अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्याचे काम करीत आहे.
पहा व्हिडिओ प्रक्षेपण :