ब्रेकिंग : जिल्ह्यातील ४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, पोलीस अधिक्षकांचे आदेश
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील ४ पोलीस निरीक्षकांची आज बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. हिवाळी अधिवेशन आटोपताच हे आदेश जारी करण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. बदल्यांच्या मागे राजकीय दबाव असल्याचे बोलले जात आहे.
नुकतेच झालेल्या हिवाळी अधिवेशनात पाईप चोरी प्रकरणात आ. राजूमामा भोळे यांनी पोलिसांनी मुख्य संशयिताचे नाव चुकवून त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करीत प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या बदलीच्या हालचाली सुरु होत्या. सोमवारी सायंकाळी महेश शर्मा यांची नियंत्रण कक्षात, तर त्यांच्या जागी आर्थीक गुन्हे शाखेचे प्रभारी पोनि संजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत इतर चार अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी काढले.
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश शर्मा यांच्या बदलीसह जिल्ह्यातील चार पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदलीचे काढण्यात आले. जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या रिक्त जागी आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी संजय गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. तर या सोबतच सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी नीलेश गायकवाड यांची एरंडोल येथे तर एरंडोलचे प्रभारी सतीश गोराडे यांची सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून बदली करण्यात आली. गोराडे यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पदभारही देण्यात आला आहे.