ब्रेकिंग : पोलिसांच्या हातावर तुरी देत अट्टल गुन्हेगार न्यायालय आवारातून पसार
महा पोलीस न्यूज | १२ जून २०२४ | जळगाव शहरात एका भंगार विक्रेत्याला मारहाण करून तीन हजार रुपये हिसकावून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शनिपेठ पोलिसांनी भोलासिंग जगदीशसिंग बावरी (३२, रा.तांबापुरा) याला न्यायालयात हजर केले होते. बुधवारी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र त्यानंतर त्याने परिसरातून पोलिसांची नजर पळ काढला.
जळगाव शहरात अनेक गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार भोलासिंग जगदीशसिंग बावरी (३२, रा.तांबापुरा) याने दि.११ जून रोजी भंगार विक्रेत्याला मारहाण करून तीन हजार रुपये काढून तो पसार झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोउनि मुबारक तडवी, पोकॉ राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे यांनी त्याला अटक केले होते.
बुधवार दि.१२ जून रोजी भोलासिंग जगदीशसिंग बावरी (३२, रा.तांबापुरा) याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्याला बाहेर आणण्यात आले असता त्याने पोलिसांची नजर चुकवत पळ काढला. पोलिसांनी त्याचा लागलीच शोध सुरू केला मात्र तो मिळून आला नाही.
दरम्यान, भोलासिंग जगदीशसिंग बावरी (३२, रा.तांबापुरा) याच्यावर या पूर्वीही एमआयडीसी, रामानंद नगर, जिल्हा पेठ पोलिस ठाणे तसेच भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे या ठिकाणी घरफोडी, खंडणी, गंभीर दुखापत करणे, विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. भोलसिंग बावरी याच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले असून ते शोध घेत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांनी दिली आहे.