Crime

ब्रेकिंग : शिवाजीनगर परिसरात महिलेचा विनयभंग, एकाला अटक

महा पोलीस न्यूज । दि.७ जानेवारी २०२४ । जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरात एका महिलेला अश्लील शिवीगाळ आणि धमकी देण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गजानन विलास बाविस्कर असे संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला दि.४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता घरात बसलेली होती. तेव्हा गजानन विलास बाविस्कर याने त्यांच्या घरी येऊन अश्लील शिवीगाळ केली. तसेच पीडित महिलेला धमकी देत त्यांच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. तसेच त्याने पीडित महिलेच्या घरावर आणि इतर लोकांच्या घरावर दगडफेक करून शिवीगाळ करत ब्लेडने दुखापत करेल अशी धमकी दिली.

पीडित महिलेच्या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी गजानन विलास बाविस्कर याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अश्विनी इंगळे करीत आहे. पोलिसांनी गजानन बाविस्कर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button