लाच मागणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षकाकडे आढळले 41 लाखांचे घबाड!

जळगाव;-कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तीस हजार रुपयांची लाच स्वीकारणारे भुसावळ विभागातील राज्य उत्पादन शुल्कच्या पोलीस उपनिरीक्षकाकडे चाळीस लाख 98 हजार 44 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
लाच लुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांनी सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकांमुळे माहिती दिली आहे. 17 ने दिलेली माहिती अशी की भुसावळ येथील राज्य उत्पादन विभागाच्या एका कारवाईत दारूच्या बाटल्या पकडून न देण्याच्या व कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तीस हजारांची लाच मागणारे उपनिरीक्षक राजकिरण सोनवणे आणि खाजगी पेंटर किरण सूर्यवंशी यांच्यावर 23 नोव्हेंबर रोजी फैसूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र. राजकिरण सोनवणे हे यावेळी फरार झाले होते.
न्यायालयाच्या परवानगीने लाचलुचपत विभागात विशेष न्यायालय भुसावळ येथे सर्च वारांच्या माध्यमातून शुक्रवारी 29 रोजी सकाळी साडेसात वाजता दोन पंच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तसेच व्हिडिओग्राफर कॅमेरामन शेत राजकीय सोनवणे यांच्या घराची झडती घेण्यात आली. या झेडपीमध्ये घरातून एक लाख 49 हजार रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या, अडीच हजार रुपये किमतीची 25 लिटर गावठी हातभट्टी दारू, बुलेट मोटरसायकल, वाहनाचे कागदपत्रे, दीड लाखांचे सोने-चांदीचे दागिने, पिस्तुलाच्या 10 रिकाम्या पुंगळ्या, 17 लाख 90 हजार रुपयांच्या सोने चांदी खरेदी केलेल्या मूळ पावत्या टीव्ही फ्रिज एसी व इतर साहित्य असा मिळून एकूण 40 लाख 98 हजार 44 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिला घागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केल्याची माहिती उपाधीक्षक योगेश ठाकूर यांनी 29 रोजी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकातून