धरणगाव पंचायत समितीचा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिड हजारांची लाच घेताना जाळ्यात

धरणगाव पंचायत समितीचा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिड हजारांची लाच घेताना जाळ्यात
जळगाव ;– धरणगाव पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याला वर्क ऑर्डर काढण्यासाठी दिड हजारांची लाच घेताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. अटक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव प्रवीण चौधरी आहे.
तक्रारदाराला वर्क ऑर्डर देण्यासाठी प्रवीण चौधरी यांनी दिड हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने तात्काळ एसीबीकडे तक्रार नोंदवली. तक्रारीच्या पडताळणीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.
शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजता कार्यालयातच प्रवीण चौधरी यांनी लाच स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.