पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक ४६.५० लाखांची लाच घेताना जाळ्यात

दोन कोटींची मागणी केल्याचे उघड
पुणे : अँटी करप्शन ब्युरो (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पुणे यांनी राबवलेल्या सापळा कारवाईत पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी (वय ३५, रा. फ्लॅट नं. ५०४, सोपान रेसिडेन्सी, गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी, मूळगाव – कर्जुले हर्या, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांना तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांनी तक्रारदाराकडे तब्बल दोन कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले असून, ही कारवाई रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी रात्री पुणे शहरातील रस्ता पेठ येथील उंटाड्या मारुती मंदिरासमोर करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून त्यांच्या आशिलाविरुद्ध बावधन पोलिस ठाण्यात कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(४), ३३६(२), ३१६(३), ३३८, ३३९ व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांच्याकडे होता. तपासादरम्यान तक्रारदाराच्या आशिलाला मदत करण्यासाठी तसेच अटकेत असलेल्या आशिलाच्या वडिलांच्या जामीन प्रक्रियेसाठी चिंतामणी यांनी सुरुवातीला दोन लाखांची मागणी केली होती. परंतु नंतर ही मागणी वाढवून तब्बल दोन कोटी रुपयांची लाच मागण्यात आली, ज्यापैकी एक कोटी स्वतःसाठी आणि एक कोटी त्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासाठी मागण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर, २७ ऑक्टोबर रोजी प्राथमिक पडताळणी करण्यात आली. पडताळणीत आरोपी लोकसेवकाने मागणी निश्चित केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, अँटी करप्शन ब्युरोकडून दि. २ नोव्हेंबर रोजी सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान आरोपीने तक्रारदाराकडून ५० लाखांच्या पहिल्या हप्त्यापैकी ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले.
आरोपीकडून मिळालेल्या रकमेमध्ये १ लाख ५० हजार रुपयांच्या खऱ्या नोटा आणि ४५ लाख रुपयांच्या बनावट (खेळणी) नोटांचा समावेश होता. त्याचबरोबर आरोपीकडून दोन मोबाईल फोन (सॅमसंग फोल्ड व अॅपल आयफोन), रोख ३६०० रुपये आणि शासकीय ओळखपत्र जप्त करण्यात आले. तसेच आरोपीच्या निवासस्थानी पथकाने तात्काळ झडती सुरू केली आहे.
या प्रकरणी समर्थ पोलिस ठाणे, पुणे शहर आयुक्तालय येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीला अटक करण्यात येणार आहे.
संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक श्री प्रसाद लोणारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे, पोशि भूषण ठाकुर, पोशि रवि दिवेकर, मपोशी सुप्रिया काळे, पोशि प्रवीण तावरे, पोशि विकास आडके, चालक पोशि दीपक दिवेकर, एएसआय चव्हाण यांचा समावेश होता. तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे यांच्याकडे असून, कारवाईचे पर्यवेक्षण पोलिस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक ४६.५० लाखांची लाच घेताना रंगेहात अटक; दोन कोटींची मागणी केल्याचे उघड