
महा पोलीस न्यूज । सागर महाजन । भडगाव शहरातील यशवंत नगर भागातील २१ वर्षीय तरुण शेतात कामाला जात असताना समोरून येणाऱ्या व्हॅगनार गाडीने ओव्हरटेक करत दुचाकीला उडवले. यामध्ये तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.८ रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान पाचोरा रस्त्यावरील आरटीओ ऑफिस जवळ घडली. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी-राजू रामचंद्र मोरे (वय ४४)धंदा मजूरी रा. यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या कडे हिरो कंपनीची एच .एफ.डिल्कस गाडी क्र.एम.एच.५४ए.६३४५ ही असून ते त्यांचे कामानिमित्त गाडी वापरत असतात.दि.८ रोजी सांयकाळी ६.४० वाजेच्या दरम्यान मी तसेच पत्नी यशोदा असे पंढरपूर होवून भडगांवला बस स्टॅन्डला उतरून घरी पायी जात असतांना मला महादू भोई त्याचे सरकारी दवाखाण्याजवळ चहाचे दुकानावर भेटला व त्यांनी मला सांगितले की, तूमचा भाचा अजय गुलाब पवार याचे आर.टी.ओ. ऑफिसच्या पूढे गाडीचे अपघात झाले आहे.
मी लागलीची असतांना आर.टी.ओ. ऑफिस जवळ गेलो असता भाचा अजय गुलाब पवार त्याचे ताब्यात असलेली हिरो कंपनीची डिल्कस कंपनीची मोटर सायकल ही रोडाच्या साईडला पडली होती व त्याठिकाणी मारुती सुझुकी वॅगनआर कंपनीची एम.एच.१९डी.व्ही.०६४८ या गाडीच्या खाली तो पडलेला होता. त्यास तोंडावर व नाकावर गंभीर दुखापत होवून रक्तस्त्राव होत होता व तो जागीच मयत झालेला होता. त्यानंतर मी व माझे सोबत विनोद पांडुरंग मोरे, किशोर भरत मालचे, दादू झुंबर कांबळे अशांनी लागलीच सरकारी दवाखाण्यात नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले.
माझा भाचा अजय गुलाब पवार हा त्याचे ताब्यातील हिरो कंपनीची एच.डिल्कस कंपनीची मोटर सायकल या गाडीने भडगांव कडून जात असतांना समोरून पाचोरा कडून येणार वेंगनर कंपनीची एम .एच.१९डी व्ही.०६४८ वरिल चालक याने आर.टी.ओ. ऑफिसध्या पूढे रोडावर समोरून भरधाव वेगाने येवून माझा भाचा याची मोटर सायकलीस समोरून ठोस मारून त्याचे गंभीर दुखापतीस व त्यांचे मरणास व मोटर सायकलीस नूकसाणीस कारणीभूत ठरला व गाडी सोडून पळून गेला म्हणून माझी त्याचे विरुध्द भडगाव पोलीस स्टेशनला फिर्याद आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. इक्बाल शेख हे करीत आहेत






