राष्ट्रीयसंत ललितप्रभ म.सा. यांच्या पंचदिवसीय प्रवचनमालेचे आयोजन

राष्ट्रीयसंत ललितप्रभ म.सा. यांच्या पंचदिवसीय प्रवचनमालेचे आयोजन
पूर्वतयारीस्तव गुरुभक्त सकल संघ समितीची स्थापना
जळगाव प्रतिनिधी कौटुंबिक व सामाजिक जीवनावरील विषयांवर आधारित प्रखर व्याख्याते , जैन धर्मीय राष्ट्रीयसंत , पूज्य ललितप्रभ गुरुदेव यांचे दि. २९ डिसेंबर रोजी शहरात आगमन होत आहे , पांच दिवस त्यांचे जळगाव शहरात वास्तव्य राहणार असून , त्यांच्या सानिध्यात २९ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत, पंच दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन शहरातील बालगंधर्व नाट्यगृह येथे करण्यात आले आहे.
गुरुदेवांचे आगमन व व्याख्यानमाला नियोजनानिमित्त पूर्वतयारीसाठी आज सकल संघाची सभा स्वाध्याय भुवन येथे कस्तूरचंद बाफना यांचा अध्यक्षतेत घेण्यात आली. सभेत विविध विषयवार चर्चा होऊन गुरुभक्त सकल संघ समिति स्थापन कारण्यात आली. समितिच्या अध्यक्ष पदी दिलीप गांधी यांची तर कार्याध्यक्षपदी अजय ललवाणी यांची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रायोजकत्व रतनलाल सी. बाफना परिवाराने स्वीकारले आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचलन स्वरूप लुंकड़ यानी केले. या सभेत पप्पू बाफना , अनिल देसरडा , कांतिलाल कोठारी , ललित लोड़ाया , नयन शाह ,शांतिलाल जैन, किरण निबजीया ,प्रदीप मुथा , अतुल जैन , शंकरलाल कांकरिया , नयनतारा बाफना ,राजकुमार सेठिया , आशीष छाबड़ा इत्यादी उपस्थित होते.
राष्ट्रसंत ललितप्रभ सागरजी महाराज हे जैन धर्मीय श्वेतांबर परंपरेतील प्रसिद्ध संत असून, त्यांच्या सरल जीवनशैली, रसमय प्रवचनांमुळे व सकारात्मक विचारांमुळे ते जनमानसात अत्यंत लोकप्रिय आहेत. प्रेम, अहिंसा, आत्म-अनुशासन आणि नात्यांमध्ये सुलझवण्याची कला यांचा संदेश देत त्यांनी समाजात सकारात्मकता व आध्यात्मिक जागृती निर्माण केली आहे.ज्या राष्ट्रसंतांना करोडो लोकांनी ऐकले आहे त्यांच्या प्रत्यक्ष सहवासात प्रवचनाचा लाभ घेण्याची हि भक्तजनांना सुवर्णसंधी आहे. मोठ्या संख्येने भाविकांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा ते आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.






