“श्री गणेशा आरोग्याचा” अभियान विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा विभागामार्फत यशस्वीरित्या संपन्न

“श्री गणेशा आरोग्याचा” अभियान विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा विभागामार्फत यशस्वीरित्या संपन्न
जळगाव प्रतिनिधी;- मुख्यमंत्री सचिवालय , मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्यामार्फत श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान 2025 नुकतेच राबवण्यात आले. सदर अभियान यशस्वीरित्या राबवण्यासाठी विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा विभागाने पुढाकार घेतला होता. विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा प्रमुख डॉ.हितेंद्र युवराज गायकवाड , सहसेवा प्रमुख दीपक भाऊ दाभाडे तसेच जिल्हा सहमंत्री राजूभाऊ गांगुर्डे यांनी महानगरातील विविध सहा ठिकाणी सेवा वस्तीमध्ये संपर्क करून तेथील गणेश मंडळांच्या मदतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. सदर आरोग्य तपासणी शिबिर हे नवनाथ मित्र मंडळ हरी विठ्ठल नगर जळगाव , उज्वल सांस्कृतिक क्रीडा मित्र मंडळ कांचन नगर , जाणता राजा सांस्कृतिक क्रीडा मित्र मंडळ शाहूनगर , अनमोल मजदूर मित्र मंडळ तुकाराम वाडी , जय हो मित्र मंडळ कौतिक नगर अयोध्या नगर परिसर आणि स्वामी विवेकानंद मित्र मंडळ कंजरवाडा येथे घेण्यात आले होते.
वरील सर्व एकत्रित सहा शिबिरांतर्गत एकूण 6000 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून या सर्व एकूण संख्येमध्ये साधारणत 300 रुग्णांचे शस्त्रक्रिया डोळ्याचे ऑपरेशन , सांधे रोपण , हृदय रोग, मणक्याचे ऑपरेशन , असे विविध आजाराच्या शास्त्रीय या मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मदाय रुग्णालय जळगाव यांच्या मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सहमंत्री राजूभाऊ गांगुर्डे यांनी दिली आहे.
सदर अभियानांतर्गत शहरातील विविध रुग्णालये तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख डॉ सिद्धार्थ चौधरी, डॉ तुषार सावरकर समाजसेवा अधिक्षक,डॉ अजित विसपुते विभाग समन्वयक तसेच गोल्ड सिटी हॉस्पिटल ,विश्व प्रभा हॉस्पिटल , शासकीय होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज
आणि धर्मदाय रुग्णालय , गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल विश्व हिंदू परिषदेतर्फे जाहीर आभार जिल्हा सेवाप्रमुख डॉ.हितेंद्र युवराज गायकवाड व सहसेवा प्रमुख दीपक भाऊ दाभाडे यांनी मानले आहे.






