Crime

मेहुणबारे पोलिसांची मोठी कारवाई; दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ३ दुचाकींसह ४ आरोपी जेरबंद

मेहुणबारे (प्रतिनिधी): चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या पथकाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींसह चोरीची दुचाकी विकत घेणाऱ्या एकाला, अशा एकूण ४ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ९०,००० रुपये किमतीच्या ३ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.

नेमकी घटना काय?

दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी दरेगाव आणि वरखेडे परिसरातून दिवसाढवळ्या दोन मोटारसायकल चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली.

तांत्रिक तपासातून आरोपींना बेड्या

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मालेगाव येथील दादू संजय सोनवणे (१९) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यातील एक आणि इतर दोन अशा तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. अधिक तपासात इतर आरोपींची नावे समोर आली:

* सुलतान सलीम शाह (३४, रा. दहिवेल, जि. धुळे): याला ११ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. त्याने चोरीची दुचाकी विलास दत्तू पिंपळसे (३०, रा. औंदाणे, जि. नाशिक) याला विकल्याची कबुली दिली.

* विलास पिंपळसे: चोरीची दुचाकी खरेदी केल्याप्रकरणी यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

* भगवान उर्फ लंगड्या सिताराम करंगळ (रा. सोनगांव): याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

टोळीवर संघटित गुन्हेगारीचा शिक्का

तपासादरम्यान असे दिसून आले की, या तिन्ही आरोपींनी संघटितपणे चाळीसगाव तालुक्यात चोरीचे अनेक गुन्हे केले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११२ प्रमाणे ‘छोटे संघटित गुन्हेगारी’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

> जप्त मुद्देमाल: ९०,००० रुपये किमतीच्या तीन मोटारसायकल.

> कारवाई करणारे पथक: सपोनि प्रवीण दातरे, पीएसआय सुहास आव्हाड, विकास शिरोळे, मोहन सोनवणे, गोकूळ सोनवणे, मिलिंद कुमावत व इतर कर्मचारी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button