Crime

क्रूरतेचा कळस, चारित्र्याच्या संशयावरून दोन चिमुकल्यांना कुऱ्हाडीचे वार करून केले ठार, पत्नी गंभीर जखमी 

चोपडा तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेलगतची घटना

चोपडा -एका क्रूर निर्दयी पित्याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिला संतापाच्या भरात कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी करून  पोटच्या दोन गोळ्यांना कुऱ्हाडीचे घाव घालून अत्यंत निर्दयीपणे ठार केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यापासून जवळ असलेल्या मध्यप्रदेश मधील देवली या गावी उघडकीस आली असून आरोपीला ग्रामस्थांनी वरला पोलीस ठाण्यात ताब्यात दिले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे चोपडा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

संजय नाना सिंग  पावरा वय 23 असे या आरोपीचे नाव असून तो आपल्या 19 वर्षे पत्नीसह गौऱ्या पाडा येथे वास्तव्याला होता. 18 नोव्हेंबर रोजी त्याचे पत्नीसोबत जोरदार भांडण झाल्याने ती आपल्या मुलांना घेऊन मध्य प्रदेश मधील देवली येथे निघून गेली होती. मात्र काही दिवसानंतर संजय हा देवळी येथे पत्नी कडे गेला असता तिथे पुन्हा त्याचे जोरदार भांडण होऊन त्याने संतापात मुलगा डेव्हिड वय 5 आणि मुलगी डिंपल वय तीन या दोघांवर कुऱ्हाडीने वार करून त्यांना जागीच ठार केले.

तर पत्नी वर देखील त्याने वार केले. मात्र पत्नी ही बचावले असून ती गंभीर जखमी झाली आहे. गावातील लोकांनी आरोपी संजय याला मध्य प्रदेशातील वरला पोलीस ठाण्यात जमा केले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संजयच्या पत्नीला गंभीर असल्याने धुळे ते शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आले असून तिची प्रकृती नाजूक असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान या घटनेमुळे चोपडा तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button