चोपडा शहरात गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवणारा तरुण अटकेत

चोपडा शहरात गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवणारा तरुण अटकेत
चोपडा – २६ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.४५ वाजता चोपडा शहर पोलिसांनी नगरपालिकेच्या पाठीमागे असलेल्या कन्नस्थाना परिसरात एका तरुणास गावठी कट्टा लावून फिरत असताना ताब्यात घेतले. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून कारवाई करत संशयिताची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला अंदाजे ४०,००० रुपयांचा गावठी कट्टा सापडला.
तपासादरम्यान त्याचे नाव कार्तिक रविंद्र पवार (वय २१, रा. जुना पारधीवाडा, अमळनेर, ता. अमळनेर, जि. जळगाव) असे असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) उल्लंघन १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक निरीक्षक एकनाथ भिसे, सफो जितेंद्र सोनवणे, दीपक विसावे, पोहेकॉ संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, हर्षल पाटील, पोना संदीप भोई, पोकों विनोद पाटील, निलेश वाघ, प्रकाश मधुरे, प्रमोद पवार यांनी सहभाग घेतला.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे करत आहेत.