Politics
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगावहून वाशिमला रवाना

महा पोलीस न्यूज | ४ फेब्रुवारी २०२४ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमानतळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी माजी आ.चंद्रकांत सोनवणे, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाशिम आणि जळगाव जिल्ह्याचा दौरा असून जळगाव विमानतळावरून ते हेलिकॉप्टर वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले.
यावेळी त्यांच्या समवेत पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, माजी आ.चंद्रकांत सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील देखील उपस्थित होते.






