Other
डॉ.मणिलाल चौधरी यांना मातृशोक

महा पोलीस न्यूज । दि.२६ जानेवारी २०२५ । जळगाव शहरातील प्रेमनगर परिसरातील रहिवासी असलेल्या गं.भा.रुख़्मिणीबाई दौलत चौधरी वय-९५ यांचे शनिवार दि.२५ रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. रुख़्मिणीबाई यांच्या पश्चात १ मुलगा, १ मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या डॉ.मनिलाल दौलत चौधरी यांच्या आई तर हितेश चौधरी यांच्या आजी होत. त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवार दि.२६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता राहत्या घरून निघणार असून नेरी नाका स्मशानभूमी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.