Detection

Detection : इन्श्युरन्ससाठी दुचाकी चोरीचा बनाव, एलसीबीने लावला छडा!

महा पोलीस न्यूज । दि.२५ जून २०२५ । जळगाव जिल्ह्यातील दुचाकी चोरीचा शोध घेत असताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुसराच गुन्हा उघडकीस आणला आहे. इन्श्युरंशची रक्कम लाटण्यासाठी दुचाकी चोरीची तक्रार पोलिसात देऊन ती दुचाकी बनावट क्रमांक टाकून दुसऱ्याला विक्री करण्यात आली होती. अखेर एलसीबी पथकाने छडा लावत गुन्हा उघडकीस आणला आहे.

जळगाव जिल्हयांत मोठ्या प्रमाणात मोटार सायकल व सायकल चोरीचे गुन्हे होत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक संदीप पाटील यांना त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मोटार सायकल चोरी करणारे आरोपी निष्पन्न करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

दुचाकीसह एकाला घेतले ताब्यात
एलसीबीच्या पथकाला अशोक हिरामण मोरे रा.दगडी मनवेल ता.यावल याचे कडेस चोरीची मोटार सायकल असल्याची माहिती मिळाली होती. पथकातील हवालदार प्रितमकुमार पाटील, पोहेकॉ यशवंत टहाकळे, पोकॉ/बबन पाटील, पोकों/प्रदिप सपकाळे यांनी त्याबाबत चौकशी सुरू केली. अशोक मोरे यास त्याचे ताब्यात असलेले बजाज कंपनीची मोटार सायकल क्र.महा.१९.सीसी.६६४० हीचेसह चौकशी कामी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथे आणले.

१६ हजारात घेतली दुचाकी
सुमारे ५ वर्षापुर्वी रावेर येथील जुने वाहन खरेदी विक्री करणारा एजेंट जफर शेख उस्मान ह.मु.जाम मोहल्ला, भुसावळ यांचे मार्फत प्रमोद निलेश कोळी रा.हुडको कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ यांच्या मालकीची मोटार सायकल ही विकत घेण्याचा सौदा केला होता. त्यावेळी आमचे तिघांचे ठरले की, मोटार सायकल ही प्रमोद निलेश कोळी याने बजाज फायनन्सकडून कर्ज घेवून घेतलेली आहे. मोटार सायकलचे हप्ते बाकी आहे. मोटार सायकलला आता महाराष्ट्र १९.सीसी.६६४० असा दुसरा आर.टी.ओ. नंबर लावलेला आहे. ही मोटार सायकल चोरी झाली अशी तक्रार प्रमोद कोळी हा पोलीस स्टेशनला देणार आहे. ठरल्यानुसार अशोक मोरे याने १६ हजार रुपये रोख देवून त्यांचेकडून दुचाकी घेतली होती. तसेच मोटार सायकल खरेदी करतांना कमिशन म्हणून २००० रुपये जफर शेख उस्मान यांनी घेतले होते.

दुचाकी चोरीचा पोलिसात खोटा गुन्हा
मोटार सायकलचा मुळ आर.टी.ओ.नंबर एमएच १९.डीके.०७५५ असा आहे. मोटार सायकल चोरी बाबत प्रमोद निलेश कोळी याने भुसावळ शहर पो.स्टे.ला तक्रार दिल्याने दि.३०/१२/२०१९ रोजी भुसावळ शहर पो.स्टे.ला CCTNS नं.२८५/२०१९ भा.दं.वि. क.३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपीतांनी बजाज फायनन्स कंपनीची फसवणुक करण्यासाठी मोटार सायकल चोरीचा बनाव केल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी अशोक हिरामण मोरे, जफर शेख उस्मान वय ३४, प्रमोद निलेश कोळी वय ३७ रा.हुडको कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ यांना ताब्यात घेवून मोटार सायकल वरील गुन्हयांत जप्त करुन भुसावळ शहर पो.स्टे. च्या ताब्यात देण्यात आले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button