चिंतामणी डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी लॅबचे जळगावात लोकार्पण

महा पोलीस न्यूज । दि.१६ जुलै २०२६ । जळगाव शहरातील ओंकार नगर, जिल्हा पेठ येथे नुकतेच चिंतामणी डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी लॅबचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. आरोग्य क्षेत्रातील उद्योजक लखीचंद जैन आणि पवन जैन यांनी पॅथॉलॉजी क्षेत्रात नवीन पाऊल टाकत हा उपक्रम सुरू केला आहे.
या लॅबच्या उद्घाटन सोहळ्यास जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा), जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (IAS), अभिजीत राऊत (IAS, JC GST, छ.संभाजीनगर), जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे, सिव्हिल सर्जन डॉ.किरण पाटील, शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन गिरीष ठाकूर, डॉ.आर.डी.मानकर, माजी महापौर ललित कोल्हे, सरिता माळी (कोल्हे), माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी नगरसेवक कुंदन काळे, ललितभैया चौधरी, मनोज काळे यांच्यासह वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
“अचूक निदान, निरोगी आयुष्य” या ब्रीदवाक्यासह चिंतामणी डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी लॅब जळगावकरांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. रक्त तपासणी, बीपी, शुगर, थायरॉईड यासारख्या नियमित तपासण्यांपासून ते प्रगत तपासण्यांपर्यंत सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. एम.डी. पॅथॉलॉजिस्ट डॉ.आर.डी.मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने अचूक आणि गुणवत्तापूर्ण अहवाल देण्याचे उद्दिष्ट या लॅबने ठेवले आहे.
जळगावकरांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विश्वासू आणि अचूक निदानाची सुविधा देण्यासाठी चिंतामणी डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी लॅब कटिबद्ध आहे. आपल्या आरोग्याच्या तपासणीसाठी या लॅबला अवश्य भेट द्या आणि दर्जेदार सेवेचा लाभ घ्या, असे आवाहन लॅबतर्फे करण्यात आले आहे.