राज्य उत्पादन शुल्क विभागाची दारुभट्ट्यांवर धाड : २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ विभागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १ महिन्याच्या कालावधीत गावठी हातभट्टीची दारू बनविणाऱ्यांवर धडक कारवाई करत सुमारे २३ लाख ९३ हजार ३१० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर एकुण ६५ असे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती भुसावळ विभागाचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सुजित कपाटे यांनी शुक्रवारी दि. १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाकाबंदीला सुरूवात केली आहे. भुसावळ विभागातील भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, वरणगाव, सावदा, निंभोरा, रावेर विभागात पथकाने कारवाईला सुरूवात केली आहे. रात्रीच्या गस्ती करीता विशेष पथक कार्यरत आहे. तसेच तापी पुर्णा क्षेत्रात बेटावर असलेले हातभट्टी केंद्रावर पथकाने होडीच्या सहाय्याने जावून गावठी हातभट्ट्या उध्दवस्थ केले. तसेच काही ठिकाणी दिवसाला ५०० वाहनांची तपासणी केली जात आहे. या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक महिन्याच्या कालावधीत गावठी हातभट्टीची दारू बनविणाऱ्यांवर धडक कारवाई करत सुमारे २३ लाख ९३ हजार ३१० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर एकुण ६५ असे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई अधिक्षक डॉ.व्ही.टी.भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक दुय्यम अधिकारी आय.बी. बाविस्कर, जवान अजय गावंडे, सरिता चव्हाण, नंदू नन्नवरे, सत्यम माळी आणि स्वप्नील पवार यांनी ही कारवाई केली आहे.