वलवाडी वि.का.सो.चेअरमन पदी नीलकंठ पाटील, व्हा.चेअरमन पदी रामदास सोनवणे यांची बिनविरोध निवड

वलवाडी वि.का.सो.चेअरमन पदी नीलकंठ पाटील, व्हा.चेअरमन पदी रामदास सोनवणे यांची बिनविरोध निवड
भडगाव – प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील वलवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी नीलकंठ वना पाटील व व्हॉईस चेअरमन पदी रामदास सोनवणे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीत ठरल्याप्रमाणे माजी चेअरमन शिवाजी पाटील यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली यात सोसायटीचे पॅनल प्रमुख व माजी सरपंच बाबाजी ओंकार पाटील यांनी पुढाकार घेऊन ठरल्याप्रमाणे प्रत्येकाला संधी दिली यात बिनविरोध ही निवडणूक प्रक्रिया ठीक अकरा वाजता विविध कार्यकारी सोसायटीच्या दालनात निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी मा.चेअरमन प्रभाकर शामराव पाटील,लोटन पाटील, शिवाजी पाटील,भीमराव पाटील, शंकर पाटील, नारायण पाटील, माधवराव पाटील, साहेबराव पाटील, प्रकाश पाटील, रवींद्र पाटील, गणेश पाटील, आदी संचालक मंडळ उपस्थित होते तसेच गावातील मा.सरपंच व मा.चेअरमन शामराव रामराव पाटील, प्रवीण पाटील, डी.के. पाटील,गोकुळ पाटील,विकास पाटील,योगेश प्रवीण पाटील, सरपंच संजय पाटील, मा. उपसरपंच अरुण सोनवणे, धनराज बागुल,मनोहर पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच शांताराम पाटील, नवल पाटील, निळकंठ पाटील,जगन्नाथ पाटील,मनोहर पाटील, गुलाबराव पाटील,ग्रामपंचायत सदस्य नाना पाटील, दिलीप पाटील, सुरेश पाटील, प्रमोद पाटील, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, साहेबराव मोरे,हिम्मत पाटील,माधवराव पाटील, दत्तू पाटील, युवराज वेळीस,सुभाष वेळीस तसेच गावातील नागरिक उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.






