धरणगाव येथे इंग्रजी विषयाच्या पेपरला अडथळा करणाऱ्यावर गुन्हा

धरणगाव येथे इंग्रजी विषयाच्या पेपरला अडथळा करणाऱ्यावर गुन्हा
धरणगाव : येथील कला आणि वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात आज बारावी बोर्डाच्या इंग्रजी विषयाचा पेपर सुरु असताना एकाने परीक्षा प्रक्रियेत अडथळा करण्याच्या प्रयत्न केला. त्याच्यावर पो.नि. पवनकुमार देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई केली.
जळगाव येथील जिल्हाधिकारी यांच्याकडील बारावी बोर्ड परीक्षा आदेश क्रमांक, जावक क्रमांक ३४३चे उल्लंघन केल्याने धरणगाव पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात पोलीस हेड कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर यांनी फिर्याद दिली आहे. तर या प्रकरणात नयन रणजीत वाघरे (रा. रामदेवजी बाबा नगर, धरणगाव) याच्यावर कारवाई करण्यात आली. यात वाघरे याने बारावी बोर्ड परीक्षा केंद्रातील १०० मीटर परिसरात इमारतीच्या आतमध्ये येवून त्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लघंन केले. तसेच महाविद्यालयाच्या कंपाऊंडमधील केंद्रावर सुरु असलेल्या परीक्षा प्रक्रियेत अडथळा आणला. तसेच तक्रारदारांना अरेरावी केली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.